आमदार रोहित पवार यांच्या सायकल मुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर

0
711

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार यांच्या सायकल मुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर

 

आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात सुमारे चौदा हजार सायकलचे वाटप करण्यात आले. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. शाळेत वेळेवर येता येते तसेच रोजच्या सायकल प्रवासामुळे शारिरीक कसरत चांगली होत आहे. शैक्षणिक विकासासाठी सायकलची चांगली मदत होत आहे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविलेले आहेत. चौदा हजार सायकली, रायटिंग पँड, चाॅकलेट, कोरोना काळात शाळांसाठी सँनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले आहे यामुळे नेतृत्व कर्तृत्व व दातृत्व हे आमदार रोहित पवार यांच्या कडेच आहे.

श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी 104 तर या वर्षी 59 सायकल आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

मतदारसंघातील शाळकरी मुलांसाठी रोहित पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबवलाय. तो म्हणजे शाळेतील मुलांना घर ते शाळा जाण्यासाठी तब्बल १४ हजार सायकलींचे वाटप केल आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला आहे.

आमदार रोहित पवार यांनी श्री साकेश्वर विद्यालयास गेल्या वर्षी 104 व या वर्षी 59 सायकल वाटप केल्या म्हणजे 163 सरासरीने पाच हजार रुपये किंमत गृहीत धरली तर आठ लाख पंधरा हजार रुपयांच्या सायकली या विद्यालयास वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हाच वेळ अभ्यासासाठी वापरता येईल.

श्री साकेश्वर विद्यालयात पिंपळवाडी, कडभनवाडी, हनुमान वस्ती,कोल्हेवस्ती, वराट वस्ती येथून सुमारे १६३ विद्यार्थी दररोज सायकल वरून शाळेत येतात सायकल मुळे या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here