रेझिंग डे सप्ताहानिमित्त जामखेड मध्ये माझे शहर स्वच्छता अभियानात सायकल रॅलीचे आयोजन

0
182

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पोलीस स्टेशन परिसरात पोलीस रेझिंग डे  सप्ताह  निमीत्त विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यामध्ये माझे शहर स्वच्छता अभियान, सायकल रॅली, कॉलेज -शाळामधील विद्यार्थ्याना शस्त्राची व पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती देणे ,  एका विद्यार्थ्याला पोलीस ठाणे अंमलदारचा चार्ज देणे, जेष्ठ नागरीकांचे तक्रारीचे निरसन करणे, कॉलेजमध्ये जावुन महिला व मुलींच्या  सुरक्षाविषयी मार्गदर्शन करणे, वाहतुकीचे नियम सांगणे, जनसामान्यात पोलीस हा जनतेचा मित्र आहेत. पोलीसांकडील शस्त्रे कशासाठी असतात त्याचा वापर कधी केला जातो.
 तसेच सामाजिक सलोख्यासाठी विविध खेळाचे आयोजन करून सामाजिक सलोखा राखणे असे विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले आहेत . या रेझिंग डे कार्यक्रमाची सुरूवात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली .
      स्वच्छता सायकल रॅलीचे उद्घाटन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व नगरपरिषदेने मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते. प्राचार्य हरिभाऊ ढवळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांना समवेत सर्वांनी सायकल रॅली मध्ये भाग घेतला. जामखेड येथे  माझे शहर स्वच्छता सायकल रॅलीने  सुरूवात करण्यात आली आहे.या सायकल रॅलीला श्री.संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड , श्री.मिनीनाथ दंडवते मुख्याधिकारी जामखेड तसेच  एन.सी.सी.विभाग प्रमुख ,  गौतम केळकर, अनिल देडे, मयुर भोसले यांचे जामखेड महाविद्यालय जामखेड ,रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेड , ल.ना.हौशिंग विद्यालय जामखेड येथील एन.सी.सी.विभागामधील 100 विद्यार्थी सहभागी झाले. सायकल रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी  स्वच्छतेविषयी जनजागृती केली. सायकल रॅलीला -बीड कॉर्नर – डी.जे.चौक नागेश विद्यालय पाठीमागे बाजु – तपनेश्वर रोड – खर्डा चौक – पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगरपरिषदेने मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, यांचे मार्गदर्शनाखाली एन.सी.सी.विभाग प्रमुख  गौतम केळकर , अनिल देडे, मयुर भोसले , पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश ढेरे यांच्या सह अनेकांनी माझे शहर स्वच्छता सायकल रॅली पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here