जामखेड न्युज——
स्वातंत्र्य दिनानिमित्त ल. ना. होशिंग विद्यालयात हजारो विद्यार्थ्यांसमवेत भव्य दिव्य 14 हजार स्क्वेअर फुटाचा भारताचा नकाशा

स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात भव्य भारताचा नकाशा उद्घाटन संपन्न झाले भव्य असा 130 फूट बाय 110 फुटाचा भारताचा नकाशा तयार करण्यात आला.(एकूण 14 हजार 300 स्क्वेअर फुट) अतिशय सुंदर भव्य असा भारताचा नकाशा प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला.

नकाशामध्ये तिरंगा दाखवण्यात आला. यावेळी केसरी,पांढरा हिरव्या रंगांचे फुगे विद्यार्थ्यांच्या हातात दिले होते. मध्यभागी भव्य अशोक चक्र होते. समाजशास्त्र विभाग प्रमुख विशाल पोले व भूगोल विभागांच्या व सर्व शिक्षकांच्या मदतीने हा नकाशा तयार करण्यात आला.

अतिशय भव्य असा एकूण 1150 विद्यार्थ्यांच्या सहभागाने भारतीय नकाशा 15 ऑगस्ट च्या निमित्ताने तयार करण्यात आला.

त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धवरावजी देशमुख ,सचिव श्री शशिकांत देशमुख,सदस्य सैफुल्ला खान, श्रीमती संगीता देशमुख मॅडम,श्रीमती नलिनी कुलकर्णी मॅडम, डॉ कल्याणराव काशीद, अमितशेठ चिंतामणी, ह गो कदम गुरुजी, डॉ फारुख शेख, ग्रामस्थ,पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आकर्षक एन सी सी संचलन झाले.
प्राचार्य श्रीकांत होशिंग उपप्राचार्य सादिक शेख उपमुख्याध्यापक रमेश चौधरी पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड.भारता नकाशा तयार करण्यासाठी खास करुन शिक्षक प्रा.राजेंद्र कोहक, प्रा.नवनाथ ढेरे, समाजशास्त्र प्रमुख विशाल पोले,कलाशिक्षक मुकुंद राऊत सर,एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, साई भोसले,आदित्य देशमुख,उमाकांत कुलकर्णी,विजय क्षीरसागर,स्वप्निल जाधव,प्रा.धीरज पाटील, स्थानिक चित्रकार सचिन विटकर,सेवक हनुमंत वराट माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक -अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच विद्यार्थी आदित्य हनुमंत साळुंखे दहावी, प्रणव यशवंत काकडे दहावी, तेजस गोरख मेत्रे दहावी,अमर बाळू विधाते,यश बाळासाहेब जगदाळे,कार्तिक महेश चत्रे दहावी क,फरान अन्सार शेख दहावी,रोहन कोल्हे,रोहन क्षीरसागर बारावी,जाधव बारावी,रोहित पवार यांनी मेहनत घेतली.

मोठ्या उत्साहाने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य दिन संपन्न केला.


