जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या अहमदनगर ते बीड या एकूण १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रुपयांच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार असून, कामास लवकरच सुरुवात होणार आहे. हा मार्ग नगर जामखेड साकत मार्गे पाटोदा बीड असा करण्यात यावा यामुळे इंधन, वेळ व पैशाची बचत होईल साकत मार्गे करण्यात यावा म्हणून साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या अहमदनगर ते बीड या एकूण १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रुपयांच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार असून, कामास लवकरच सुरुवात होणार आहे. हा मार्ग नगर जामखेड साकत मार्गे पाटोदा बीड असा गेल्यावर दहा किलोमीटर अंतराची बचत होईल. यामुळे वेळ, इंधन व पैशाची बचत होईल त्यामुळे हा मार्ग जामखेड वरून साकत मार्गे पाटोदा बीड असा करण्यात यावा असे निवेदन साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ हा नगर बीड असा आहे
तर करमाळा, जवळा, नान्नज, जामखेड, साकत मार्गे पाटोदा राज्यमार्ग क्रमांक ५६ आहे. तेव्हा साकत मार्गे राष्ट्रीय महामार्ग जावा म्हणून साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखाली तसेच जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट, प्रा. युवराज मुरुमकर, राजाभाऊ वराट, वसंत वराट, शिवाजी मुरुमकर, अविन लहाने, नानासाहेब लहाने, काशिनाथ पुलवळे यांच्या सह अनेक जण खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना निवेदन देताना उपस्थित होते.