राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धेत गुणवंत विदयार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव राजुरीच्या 29 विद्यार्थ्यांचे यश

0
577

जामखेड न्युज——

राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धेत गुणवंत विदयार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव

राजुरीच्या 29 विद्यार्थ्यांचे यश

 

ग्लोबल व्हिजन फाउंडेशन, पुणे, संचलितइन्स्पायर अबॅकस अँण्ड वैदिक मॅथ अकॅडमी मार्फत रविवार दि. 21 जुलै 20२४ रोजी रामकृष्ण लॉन्स कॅनॉल रोड, बीड या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरीलऑफलाईन अबॅकस स्पर्धेचे आयोजन करूनप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी देशभरातून 745 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅच क्लासेस राजुरी, ता-जामखेड च्या 29 विद्यार्थ्यांनी यशाचा उच्चांक गाठला आहे. त्यामध्ये विशेषप्राविण्य मिळवत सुरज लक्ष्मन मोरे या विद्यार्थ्यायास 3000/- रु चा धनादेश देऊन गौरविण्याताआले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विदयार्थ्यांपैकी कृष्णा काळदाते या विदयार्थ्यास चँपीयन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अथर्व चौभारे, हर्षद काळदाते, अर्जुन गायकवाड, सिद्धी काळदाते (प्रथमक्रमांक),

यश कोल्हे, वृषाली राऊत, सार्थक लटपटे, संकेत मोरे, तनुजा कोल्हे (द्वितिय )


तृप्ती घुले, श्वेता खाडे, अनुष्का मोरे, संस्कार बोरकर, राधिका कोल्हे अनुष्का कोल्हे, आयुष कोल्हे, श्रेया कोल्हे, कार्तिक कोल्हे, अमृता चौमारे, तनुजा कोल्हे, पीयुष माने, तनुजा डोंगरे, तेजस्विनी आजबे, कार्तिक जायभाय, करण गायकवाड भाग्यश्री खाडे, ओम घुले या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा मध्ये रँक मिळवून यश प्राप्त केले.

तसेच अमृता खाडे, सोहम कोल्हे,संग्राम कोल्हे, कात्यायानी अजबे, महेश गायकवाड, श्रीयश जायभाय, समृद्धी काळदाते, समर्थ सुतार, रोहन खाडे, प्रिती खाडे, इश्वरी नन्नवरे मोरे, ऋतुजा सानप, वैष्णवी काळदाते, शिवराज मोरे हे बेस्ट स्टुडन्ट ठरले. या सर्व विद्यार्थ्याचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका अश्विनी कोल्हे यांचे सर्व पालक व सर्व मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अँकॅडमीच्या अध्यक्षा सौ. अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, अकॅडमीचे सर्व संचालक सर्व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here