जामखेड न्युज——
प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन – अमित जाधव
ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा)राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होणार साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक अमित जाधव यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर (आबा)राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती नगर परिषद चे माजी नगरसेवक अमित जाधव यांनी दैनिक सुर्योदय न्यूज ला दिली आहे.
या मध्ये धाकटी पंढरी (धनेगाव) येथे वृक्षारोपण तसेच महावीर भवन येथे धाकटी पंढरी (धनेगाव) या ठिकाणी दिंड्या घेऊन जाणाऱ्या महाराजांचा सन्मान, विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार,अनाथ, निराधार बालकांना अल्पोपहार, पत्रकार सन्मान असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
जामखेड शहरातील महावीर भवन येथे वार रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर ( आबा) राळेभात यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती.