जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शेतकरी पुत्राची रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी निवड
जामखेड तालुक्यातील शिऊरचे माजी सरपंच तसेच जामखेड रोटरी क्लबचे माजी खजिनदार समाजकार्याचा वसा सांभाळणारे, जिद्द, चिकाटी व मेहनतीने आपले वलय निर्माण करणारे सोमनाथ तनपुरे यांची रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल चे अधक्ष म्हणून सोमिनाथ ज्ञानदेव तनपुरे तर सेक्रेटरी आशीर्वाद तुपे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ईलेक्ट संतोष मराठे व असिस्टंट गव्हर्नर डॉ मिलिंद भोसुरे उपस्थित होते. आताचे अध्यक्ष रंजन पराडकर व सेक्रेटरी राजेंद्र कोते यांनी नवीन अध्यक्ष सोमिनाथ तनपुरे व सेक्रेटरी आशिर्वाद तुपे यांनी कॉलर व चार्टर देऊन पदग्रहण सोहळा पार पडला.अध्यक्ष पदाची पीन डीजीई संतोष मराठे यांनी लावली.
मावळते अध्यक्ष रंजन पराडकर यांनी मागील वर्षी राबवलेल्या विविध प्रकल्पाची माहिती दिली व नवीन अध्यक्ष सोमिनाथ तनपुरे यांनी चालू येणाऱ्या रोटरी वर्षा मध्ये राबविण्यात येणार विविध समज उपयोगी प्रकल्पाची माहिती दिली.
सोमिनाथ तनपुरे हे जामखेड तालुक्यातील शिऊर मधील शेतकरी कुटुंबातील असून आता व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे राहत असून त्यांचा राजमुद्रा ऑटो नावाने चारचाकी गाडी खरेदी विक्री च खराडी पुणे मध्ये व्यवसाय आहे.सोमिनाथ तनपुरे यांनी शिऊर ग्रामपंचायत चे सरपंच पदही भूषवले आहे. रोटरी क्लब ऑफ जामखेड मध्येही त्यांनी खजिनदार म्हणून काम केले ले आहे.
समाजसेवेचा त्यांचा व्यासंग त्यांना पुणे मध्ये ही स्वस्त बसू देत नव्हता,त्यांनी गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल रंजन पराडकर यांच्या माध्यमातून जॉईन केला व वर्षभर त्यांच्यासोबत विविध प्रकल्पामध्ये काम सुद्धा केलं.रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल चे जेष्ठ मार्गदर्शक वामन भुरे, महेंद्र लुनीया, रंजन पराडकर यांनी सोमनाथ तनपुरे यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांना या वर्षी चे अध्यक्ष पद स्विकारण्याची सूचना केली आणि आज पदग्रहण समारंभ पार पडला.यावेळी पदग्रहण समारंभाला रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल चे सर्व संचालक, मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे स्पेन मधील माद्रिद शहरातील रोटरी क्लब चे सोमेश भोजवानी त्यांचा क्लब च फ्लॅग घेऊन हजर होते,ते होरेका चे प्रसिद्ध व्यापारी अशोक थाडानी यांचे मित्र होत.