जामखेड न्युज——
जागृत मतदार उद्याचे भविष्य – प्राचार्य डोंगरे
जामखेड महाविद्यालयात मतदार नाव नोंदणी शिबीर संपन्न
जागृत मतदार हे उद्याचे भविष्य असून समृद्ध लोकशाहीचा वारसा जपण्यासाठी युवा पिढीने जागरूकता दाखवून, मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. आजचे नवमतदार विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने या योजनेचे दूत आहेत असे सांगून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्य एम. एल. डोंगरे यांनी केले.
जामखेड महाविद्यालय जामखेड व तहसील कार्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मतदार नाव नोंदणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डोंगरे एम.एल होते. या कार्यक्रमासाठी जामखेडचे निवडणूक अधिकारी तसेच नायब तहसीलदार मनोज भोसेकर, नायब तहसीलदार विजय इंगळे मंडल अधिकारी प्रशांत माने, विश्वजीत चौगुले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रा . फलके ए. बी. व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. मनोज भोसेकर यांनी मतदार नोंदणी संबंधी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने मतदान फार्म भरता येईल. मतदान नोंदणी करणे करणे हे फार महत्वाचे आहे. असे असे सांगून नोंदणीची प्रक्रिया सांगितली. याप्रसंगी प्रा फलके ए बी व प्रा महारनवर डी.एस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर.ए तर प्रस्ताविक प्रा. फलके ए बी यांनी केले. आभार प्रा. मोहळकर एस.डी यांनी मानले. या कार्यक्रमांसाठी प्रा मसके जी.आर , प्रा किरदात जी.एल , प्रा.मिसाळ टी.एम, प्रा.अडाले एल.बी , प्रा कांबळे आर.एस यांचे सहकार्य लाभले.