फक्राबाद येथे श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

0
531

जामखेड न्युज——

फक्राबाद येथे श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

धन्य ते अरण,रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर,प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।। केल संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…!


आज फक्राबाद मध्ये श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पुण्यतिथी निमित्ता अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाची आज सकाळी गावातून संत सावता महाराजांच्या पादुका घेऊन गावातून मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी जि.प.प्राथ. शाळा फक्राबाद व श्री. आणखेरी देवी विद्यालय फक्राबाद येथील विद्यार्थी, शिक्षक यांनी मोठ्या उत्साहात टाळ मृदूंगात घोषणा देत, भजन करत ,घोडे व झेंडे नाचवत या फेरीला सहभाग नोंदवला.

विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी संत सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विविध संत आणि महापुरुषांच्या वेशभूषा सादर करून कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली. यावेळी गावातील सर्व महिला वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व लहान थोरांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या फेरी नंतर ह.भ.प. अशोक महाराज भाकरे यांचे काल्याचे कीर्तन झाले व परंपरे नुसार काहि भारुडे झाली. त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पर पडला.

फक्राबाद पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थानी या साठी उपस्थिती दाखवली त्या बद्दल क्रांतिसुर्य ग्रुप, फक्राबाद आपला आभारी आहे.

हा अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात पार पाडण्यासाठी क्रांतिसुर्य ग्रुप फक्राबाद व समस्थ ग्रामस्थ फक्राबाद यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here