जामखेड न्युज——
खवय्यांच्या जीभेवर राज्य गाजवणारे हाॅटेल सैराट जामखेडकरांच्या सेवेत

९ वर्षाची खाद्य परंपरा असलेल्या व जामखेड करांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या स्नॅक्स वर्ल्ड यांच्या हाॅटेल सैराट चा शुभारंभ बीड रोडवरील नवीन जागेत सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी करण्यात आला यामुळे स्वादिष्ट खाद्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. अशी माहिती सैराट चे संचालक दीपक टेकाळे व अमोल फंदाडे यांनी केले आहे.

आता नवीन पत्त्यावर ..!स्नॅक्स वर्ल्ड यांचे हॉटेल सैराट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आता नव्या प्रशस्त जागेत बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपासमोर सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी आईसाहेब मंगल अर्जुन टेकाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. यावेळी वास्तुविशारद शकुर शेख तसेच संजय बापू कार्ले सह परिसरातील अधिकारी पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हाॅटेल सैराटची वैशिष्ट्ये
१००% प्युअर व्हेज
खास महिलांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था
फॅमिली गार्डन
बड्डे सेलिब्रेशन
किड्स प्ले एरिया
वॉशरूम
पार्किंग
नवीन पत्ता:- नवले पेट्रोल पंपा जवळ, बीड रोड, जामखेड गेल्या नऊ वर्षापासून जामखेडकरांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या हाॅटेल सैराट चा नवीन जागेत सोमवारी शुभारंभ करण्यात आला. खवय्यांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

जामखेड परिसरातील खवय्यांना हाॅटेल सैराट च्या रूपाने मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. एकदा भेट देऊन स्वादिष्ट पदार्थांची चव चाखावी असे आवाहन संचालक दिपक टेकाळे व अमोल फंदाडे यांनी दिली आहे.






