जामखेड न्युज——
मजुराचा मुलगा महादेव साबळे याची पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड

आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेड चा वुशु खेळाडू महादेव कुंडलिक साबळे यांची नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड झाली आहे. यामुळे त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महादेव साबळे यांनी आपले पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण लांजेश्वर ता. भूम येथे झाले इयत्ता अकरावी व बारावी शिक्षण ल.ना. ज्युनियर काॅलेज जामखेड येथेपूर्ण केले.

त्याच दरम्यान त्यांनी नवीन मराठी शाळा जामखेड येथे वूशू खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली महादेव साबळे यांनी अहमदनगर जिल्हा वूशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक श्याम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली दोन राज्य वुशु स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले होते.

तसेच काही दिवस त्यांनी जामखेड येथे वुशु खेळाचे प्रशिक्षण हि दिले.

त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे साहेब तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे साहेब मा.जि.प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश काका देशमुखअहमदनगर जिल्हा वूशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक श्याम पंडित, आबा जायगुडे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.










