दृष्टीदोष दाखवून पुजा खेडकर बनली आयएएस? वडिलांचे उत्पन्न 40 कोटी, तरीही नॉनक्रिमीलेयर दाखला

0
1098

जामखेड न्युज——

दृष्टीदोष दाखवून पुजा खेडकर बनली आयएएस?

वडिलांचे उत्पन्न 40 कोटी, तरीही नॉनक्रिमीलेयर दाखला

आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या. यानंतर महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक सचिव एस. एम. महाडिक यांनी याबद्दल परिपत्रक काढले आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांची आयएएस पदी झालेली नियुक्ती तसेच प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरच्या काही घटनांमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. तर त्यांच्यावर आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले.

चला तर जाणून घेऊया, आयएएस पूजा खेडकर व त्यांच्या वडिलांविषयी व त्यांच्या नियुक्तीवरून नेमका काय वाद सुरू आहे.

RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी
पूजा खेडकर या IAS कशा झाल्या यावरुन वाद आहेत. परीक्षार्थी असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणे, अधिकाऱ्यांना त्रास देणे, या गोष्टी सातत्याने होत होत्या. यामुळे मी चौकशीच्या मागे लागलो आणि त्याबद्दल तक्रार केली. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिव यांना पाठवला. त्यानंतर मग पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली झाली. पण ही बदली होऊ शकत नाही, असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला.

6 वेळेस मेडिकल चाचणीला गैरहजरी

कुंभार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पूजा खेडकर यांच्यावर जे आरोप आहेत, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दृष्टीदोष असल्याचे सांगून खेडकर यांनी युपीएससीकडे प्रमाणपत्र सादर केले. परंतु IAS झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती. त्या 6 वेळेस अनुपस्थित राहिल्या. तसेच ओबीसीमधून त्यांनी IAS ची परीक्षा दिली. खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र

नॉनक्रिमीलेयर दाखल्यात वडिलांचं उत्पादन ग्राह्य धरले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. तसेच त्यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे स्वतः लिहून दिलेलं आहे. त्यामुळे IAS हे अत्यंत प्रतिष्ठेची सेवा आहे. त्यात अशा व्यक्ती असणं चुकीचं आहे, असेही विजय कुंभार म्हणाले.

कोण आहेत पूजा खेडकर?

पूजा खेडकर या 2022 च्या बॅचची IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्यांनी UPSC परीक्षेत 821 (Pwd-5) रँक मिळवल्याचे सांगितले जाते. त्या पुण्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र आता वाशिममध्ये बदली झाली आहे. पूजा खेडकरचे आजोबा सरकारी कर्मचारी होते. तर वडील दिलीपराव खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) निवृत्त अधिकारी आहेत. पूजा यांची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या सरपंच आहेत.

वरिष्ठाच्या चेंबर बळकावले?
पुण्यातील प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नव्यानेच प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडकर यांच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लाजवतील अशा मागण्या आणि ‘कारनामे’ अलीकडच्या काळात चर्चेचा विषय ठरत होते. पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू झाल्या. डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला. वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या अधिकारी मॅडमनी चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला होता, अशी माहिती समोर आली.

वडील दिलीप खेडकरही वादग्रस्त?
दिलीप खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे दिलीप खेडकर यांची पत्नी डॉ.मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती.त्यांचे एकदा निलंबनही झाले होते. दिलीप खेडकर यांना दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर आणि पूजा खेडकर…पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here