जामखेड न्युज——
जामखेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी कैलास खैरे
बाळासाहेब धनवे उपशिक्षणाधिकारी अहमदनगर येथे मुळ पदावर
जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची जामखेड गटशिक्षणाधिकारी पदाचे प्रशासकीय बदलीचे आदेश प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांनी रद्द केलेले असल्याने त्यांची मुळ पदावर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर येथे रिक्त पदावर पदस्थापना करण्यात आलेने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जामखेड गटशिक्षणाधिकारी पदी विस्तार अधिकारी कैलास खैरे यांच्या कडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री. बाळासाहेब यमाजी धनवे, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अहमदनगर यांना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड या पदावर प्रशासकीय कारणास्तव बदलीने पदस्थापना देण्यात आलेली होती.
तथापी शिक्षण उपसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय पुणे यांचेकडील दि.12/06/2024 चे आदेशान्वये मा.प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांनी दिनांक 15/04/2024 चे निकालानुसार श्री. बाळासाहेब यमाजी धनवे यांची प्रशासकीय बदलीचे आदेश रद्द केलेले असल्याने त्यांची मुळ पदावर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर येथे रिक्त पदावर पदस्थापना करण्यात आलेने त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असलेबाबत कळविलेले आहे.
सबब श्री. बाळासाहेव यमाजी धनवे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड, जि. अहमदनगर यांना शिक्षण उपसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय पुणे यांचेकडील दि.12/06/2024 चे आदेशान्वये
उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर या पदावर पदस्थापना करण्यात आलेने त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेने त्यांचेकडील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड पदाचा कार्यभार नियमित गटशिक्षणाधिकारी हजर होईपर्यंत अथवा पुढील आदेश होईपर्यंत श्री. कैलास खैरे (विस्तार अधिकारी सांख्यकी) -पंचायत समिती जामखेड यांचेकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात येत आहे.
तरी आपण मुळ पदाचे कर्तव्य व जबाबदा-या सांभाळुन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पदाचे कर्तव्य जबाबदा-या पार पाडाव्यात. तसेच सदर आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयास विनाविलंब सादर करावा.