उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणजे योगा – जितेंद्र बोरा ल. ना. होशिंग विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

0
743

जामखेड न्युज——

उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणजे योगा – जितेंद्र बोरा

ल. ना. होशिंग विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

 


आजकाल सगळ्यांनाच फिट राहायला आवडते. त्यासाठी आपण काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतो. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे शुद्धीकरण करतो. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. असे योग तज्ञ जितेंद्र बोरा यांनी सांगितले.


आज ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी योग प्रशिक्षक जितेंद्र बोरा यांनी योग वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.व्यायामाचे महत्त्व सांगताना उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे असे सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांनी जर आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. हे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व योग प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार गणेश माळी, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश चौधरी,पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती संगिता दराडे, सीनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक मोहिते सर व एनसीसी विभाग प्रमुख केळकर सर सर्व उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारीआदरणीय बाळासाहेब धनवे, यांनी ल.ना.होशिंग विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सातत्याने वेगवेगळे उपयुक्त असे उपक्रम घेतले जातात याबद्दल शाळेचे व प्राचार्य श्रीकांत होशिंग व सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. व योग दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तहसीलदार गणेश माळी यांनीही विद्यार्थ्यां सोबत प्रात्यक्षिक करण्याचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी व्यायामाबरोबर आहारबद्दल महत्त्व देऊन आपण आपला आहार सकस असावा त्यामध्ये कडधान्य, फळ, दूध, पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा उत्तम आहार, योग्य व्यायाम त्यामुळे शरीर निरोगी राहिल व अभ्यासातही आपली प्रगती होईल.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व मनोगता मधून सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंखे, बापू जरे, धीरज पाटील, भरत लहाने, विशाल पोले, बबनराव राठोड, रोहित घोडेस्वार, किशोर कुलकर्णी, साई भोसले, पंकज पोकळे, विजय क्षीरसागर, समारंभ प्रमुख आदित्य देशमुख,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले. व आभार श्री पोपट जगदाळे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here