Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात पुन्हा साखळी उपोषण सुरु करणार – मराठा क्रांती मोर्चा

जामखेड तालुक्यात पुन्हा साखळी उपोषण सुरु करणार – मराठा क्रांती मोर्चा

0
468

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात पुन्हा साखळी उपोषण सुरु करणार – मराठा क्रांती मोर्चा

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ तारखेपासून आंतरवली सराटी येथे सरकारने सगेसोऱ्यां बाबत अध्यादेशाचा कायदा पारित करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण लागू करून त्याची आमंलबजावणी करावी यासाठी पुन्हा अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.


या उपोषणास जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे
तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत आसल्याचे दिसुन येत आहे.

 

सरकारने व प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गावोगावी साखळी उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे.

तसेच उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे त्यांच्या जिवीतास हानी पोहचली तर समाजाचा उद्रेक होईल त्यास संपुर्णपणे सरकार व प्रशासन जबाबदार राहिल आसे निवेदनात म्हटले आहे याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सरकारला फटका बसला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आनेक आंदोलने मोर्चा उपोषण करूनही आणखीही आरक्षणाचे घोंगडे भिजत आहे सरकारने आतातरी या आंदोलनामुळे बसलेल्या फटक्याचा बोध घ्यावा व आंदोलनावर कायमचा तोडगा काढावा आन्यथा पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत या आंदोलनामुळे सत्तेतील सरकारला फार मोठा फटका बसणार आसल्याचे बोलले जात आहे तसा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सकाळी अकारा वाजता जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!