संजय काशिद मित्रमंडळ तसेच कोरेगाव, माण खटाव, जामखेड तालुक्यातील धारकऱ्यांच्या वतीने श्री वर्धनगडावर स्वच्छता मोहीम गडावरील तीन जुन्या टाक्यातील गाळ काढून केली स्वच्छता
संजय काशिद मित्रमंडळ तसेच कोरेगाव, माण खटाव, जामखेड तालुक्यातील धारकऱ्यांच्या वतीने श्री वर्धनगडावर स्वच्छता मोहीम
गडावरील तीन जुन्या टाक्यातील गाळ काढून केली स्वच्छता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा येथील श्री वर्धनगडावर दुर्गसंवर्धन मोहीमेंतर्गत पुरातन पाण्याच्या टाक्यातील गाळ, चिखल काढण्याचे काम कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील धारकरी तसेच जामखेड तालुक्यातील धारकरी व संजय काशिद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यामुळे किल्ले वर्धनगडावर तीन्ही पाण्याच्या टाक्यातील संपूर्ण गाळ काढण्यात आला याबद्दल सर्व धारकऱ्यांचे व संजय काशिद मित्रमंडळाचे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत
श्री वर्धनगडावर रविवारी कोरेगाव , माण खटाव मधल्या धारकर्यांनी दुर्गसंवर्धन मोहीम ठेवली होती यात संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान करण्यासाठी तसेच स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी जामखेड वरून शनिवारी सायंकाळी निघाले होते.
रात्री साडेअकरा वाजता जामखेड संजय काशिद, बबलु वस्ताद टेकाळे, केशव कोल्हे, राजु भांबे निघाले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरेगाव तालुका प्रमुख अजयदादा बर्गे संपर्कात होते फोनवरूनच महाप्रसादाच नियोजन केलं होते.
जामखेड वरूनक्षबारामती फलटण मार्गे गडाच्या पायथ्याला असलेल्या वर्धनगड गावात पहाटे चार वाजता पोहोचलो तिथंच जिल्हा परिषद शाळेत सकाळपर्यंत विश्रांती घेतली फ्रेश होऊन सकाळी आठला चढाई सुरु केली गडमाथा खुणावत होता एका तासात गडावर पोहोचलो गडाच्या डाव्या अंगाला आपले माण खटाव कोरेगाव तालुक्यातील धारकरी गडावरील पाण्याची टाकी स्वच्छ करत होते तिन्ही टाक्यात पोरं उतरली होती चिखल गाळ माती बाहेर टाकण्याचं काम चालू होतं.
जामखेड मधील धारकरी व संजय काशिद मित्रमंडळ सहभागी झाले संजय काकांनी तर रात्रभर ड्रायव्हिंग केलेली असताना देखील कुदळ घेऊन खणायला सुरुवात केली खोरी फावड चालु लागली अन् त्याबरोबर शिवबानं सांगावा धाडलाय रं, मर्दाची तुटली बघा रं ढाल, एकमुखानं बोला बोला जय हनुमान ही पद्य म्हणतं शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात काम चालु होतं एक गट थकला कि दुसरा गट कामाला लागत काम करी
ह्या सर्वात मला अचंबित करणारी गोष्ट म्हणजे काकासाहेब काकांना शिवकार्याची आवड आहे हे मला माहीत आहे परंतु राजकीय नेता उद्योजक हे वलयं पाठीशी असताना ते त्या टाक्यामधला गाळ माती काढण्याच्या खणण्याच्या पाट्या बाहेर टाकण्याच्या ह्या शिवकार्यात रमुन गेले होते मोहीम पुर्ण होईपर्यंत ते त्यात श्रमदान करत होते
श्रमदान कार्य पुर्ण झाल्यानंतर भात सांबर लापशी असा बेत होता महाप्रसादाच्या वेळी अजयदादांनी काकांना सत्कार स्विकारण्याची विनंती केली परंतु काकांनी त्याला नम्रपणे नकार दिला
गडकिल्ल्यांची त्यांना भारी आवड वर्धनगडाची ढासळलेली तटबंदी बघुन लै हळहळले निघताना ओंजळभर माती कॅरिबॅगमध्ये भरून बॅगेत भरून ठेवताना कोल्हे सरांना म्हणाले मी ज्या गडकिल्ल्यांवर जातो तिथली माती आणतो आज त्यात वर्धनगड सामील झाला.
बरोबर दुपारी दोन वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित वर्धनगड दुर्गसंवर्धन मोहीम ध्येयमंत्राने समाप्त झाली ह्यात माण खटाव कोरेगाव ह्या तालुक्यातील आपल्या धारकरी बंधु शिवभक्त तरुण तरुणी सहभागी झाले होते. ह्या मोहीमेत जामखेड तालुक्यातुन आमचे मार्गदर्शक श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री संजयकाका काशिद, बबलु वस्ताद टेकाळे, बबलु निकम , राजु भांबे, केशव कोल्हे या आम्हां सर्वांना या संवर्धन मोहीमेत सहभागी केल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरेगाव माण खटाव विभागातील सर्व धारकरी व अजयदादा बर्गे यांचे आभारी आहोत. एक धारकरी