जामखेड न्युज——
शाळेत गैरहजर शिक्षकास गटशिक्षणाधिकारी यांनी बजावली नोटीस!!!
शाळेत गैरहजर असणारा व शिक्षण विभागाची बातमी वर्तमान पत्रात देऊन प्रशासनाची बदनामी करणाऱ्या विजय जाधव यांना गटशिक्षणाधिकारी यांनी बजावली नोटीस बजावली आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद शाळा मोहा ता. जामखेड येथे दि. २३ / ३ / २४ रोजी सकाळी ७.५० वाजता भेट दिली होती. त्यावेळी विजय जाधव व इतर दोन शिक्षक शालेय कामी गैरहजर होते.
त्यांना कार्यवाहीच्या अधिन राहून शालेय कामी हजर होणेसाठी परवानगी देण्यात आली होती . याचा राग मनात धरून विजय जाधव यांनी दि. २५ / ४ / २४ रोजी वर्तमान पत्रात मध्ये बातम्या दिल्या. प्रशासनाची व कार्यालयीन प्रमुख यांची बदनामी केली. सदरची बाब गंभीर स्वरूपाची कार्यालयीत शिस्तिचा भंग करणारी आहे.
त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग करणारी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल ) १९६४ नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे दिलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये सुचित करण्यात आले आहे.
सदरचे शिक्षाक यापूर्वीही गैरहजर होते. त्यांच्या बातम्या वर्तमान पत्रातही आल्या होत्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मार्च महिन्यात शाळेची वार्षिक तपासणी करण्यात आली तेव्हा सर्व मुले अ प्रगत दिसून आले होते. त्यांच्या कामकाजात व वर्तनात कोणताही बदल झालेला दिसुन येत नाही. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे .