डॉ. शत्रुघ्न कदम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न विविध मान्यवरांची उपस्थिती

0
643

जामखेड न्युज——

डॉ. शत्रुघ्न कदम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

विविध मान्यवरांची उपस्थिती

 

दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ शत्रुघ्न कदम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा माजी सचिव अनिल गुंजाळ, विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर संस्थेचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

डॉ. शत्रुघ्न कदम हे जामखेड महाविद्यालयामधील आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या शिक्षण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे अध्यापनामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील मूळ रहिवासी असणाऱ्या कदम सर यांची कारकीर्द प्रतिकूलतेवर मात करुन अतिशय संघर्ष करीत प्रगती साधणारी राहिली. त्यांच्या या दैदिप्यमान कारकीर्दीला सलाम करण्यासाठी सेवापूर्ती कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा उध्दव (बापु) देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव शशिकांत देशमुख, प्राचार्य जी . पी ढाकणे सर ,पाथर्डी, शिक्षक बँकचे चेअरमन भाऊसाहेब कचरे सर , नगर, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य के. एच शिंदे सर, ह.भ.प.अशोक महाराज बोंगाणे सर, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ बाळासाहेब सांगडे , एडीसीसी बँकचे संचालक बाळासाहेब साळुंके कर्जत, राजेंद्र कोठारी, सुरेश भोसले,प्राचार्य एम.एल. डोंगरे सर, जामखेड महाविद्यालय, जामखेड,प्रा. मधुकर आबा राळेभात, उपप्राचार्य डॉ सुनील नरके सर, डॉ. जाधव गोपाल, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, अनेक नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच जामखेड मधील अनेक प्रतिष्ठित व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रा.कदम सरांनी विद्यार्थ्यांकरता घेतलेले कष्ट, सामाजिक बांधिलकी मानीत केलेले कार्य, आध्यात्मिक क्षेत्रात करीत असलेली सेवा यावर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी कदम सरांच्या आयुष्यातील चढउतारांचा आढावा घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखविले.
आजी – माजी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, आध्यात्मिक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ कदम सर यांनी अतिशय भावनिक संवेदनशील मनोगत व्यक्त केले. यामुळे अनेकांची मने हेलावून गेली.

या कार्यक्रमाचे आयोजन जामखेड महाविद्यालय व इंग्रजी विभाग यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डोंगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा मधुकर आबा राळेभात यांनी केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा हेमंत जाधव व प्रा घोगरदरे यांनी केले.यावेळी सरांच्या जीवनावर आधारित एक सुंदर चित्रफित प्रा हेमंत जाधव यांनी तयार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here