अनाधिकृतपणे स्थापन करण्यात आलेल्या जामखेड तालुका समन्वय समितीला सर्व संघटनांचा विरोध जामखेड तालुक्यातील शिक्षकांचे राजकारण पेटले

0
1721

जामखेड न्युज——-

अनाधिकृतपणे स्थापन करण्यात आलेल्या जामखेड तालुका समन्वय समितीला सर्व संघटनांचा विरोध

जामखेड तालुक्यातील शिक्षकांचे राजकारण पेटले

 

काल जामखेड तालुक्यातील काही शिक्षकांनी समन्वय समितीच्या अध्यक्षाची निवड केली होती. आज अनेक संघटनांचे पदाधिकारी व जुन्या समन्वय समितीचे सदस्यांनी एकत्र येऊन अनाधिकृतपणे स्थापन करण्यात आलेल्या जामखेड तालुका समन्वय समितीला सर्व संघटनांचा विरोध असल्याचे सांगत लवकरच नवीन समन्वय समिती स्थापन करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांचे राजकारण पेटले आहे.

जुन्या समन्वय समितीमधील अर्ध्या अधिक लोकांचा नवीन समन्वय समिती निवडीला विरोध. एकाच ठराविक संघटनेचे शिक्षक नविन निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत.

सदर निवडीला संभाजीराव थोरात गट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (ऐक्य मंडळ),इब्टा संघटना, कास्ट्राईब संघटना, शिक्षक परिषद संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना या संघटनांपैकी एकही सदस्य नवीन निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेला नाही.

जुन्या समन्वय समितीमधील नारायण राऊत, संतोष डमाळे, अनिल अष्टेकर, जालिंदर राऊत, प्रदीप कांबळे, विकास हजारे, राम निकम या सर्व सदस्यांचा सदरील निवडीला विरोध असताना एका ठराविक संघटनेने समन्वय समिती मनमानी पद्धतीने कारभार करून बेकायदेशीर रित्या निवडलेली आहे.

लवकरच वरील सर्व संघटना एकत्रित बसून सर्वानुमते तालुक्याची नवीन समन्वय समिती स्थापन करण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

नवीन तालुका समन्वय समिती मधील सदस्य पाहिले असता ते एका विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी आहेत असे सर्वांच्या निदर्शनास आले.
आज या संदर्भात वरील सर्व संघटनांची मीटिंग झाली, यावेळी संभाजीराव थोरात गटाचे किसन वराट ,नारायण राऊत, नानासाहेब मोरे ,राम निकम, नवनाथ बहिर, अरुण मुरुमकर,मल्हारी पारखे, राम ढवळे, अभिमान घोडेस्वार, उपेंद्र आढाव, महेश मोरे ,रज्जू साखरे, विजय जाधव, हनुमंत निंबाळकर, प्रवीण पवार, विजय रेणुके ऐक्य मंडळाचे संभाजी तुपेरे, इब्टा संघटनेचे जालिंदर राऊत ,अशोक राऊत. शिक्षक समितीचे अनिल अष्टेकर, संतोष डमाळे. कास्ट्राईब संघटनेचे प्रदीप कांबळे .मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे उत्तम पवार .महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सुभाष फसले ,नारायण लहाने. शिक्षक परिषदेचे वैजनाथ गीते, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लवकरच या सर्व संघटनांना विचारात घेऊन नवीन तालुका समन्वय समितीची कार्यकारणी निवडण्यात येईल असे ठरवण्यात आले आणि बैठकीची सांगता करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here