जामखेड न्युज——
जामखेडमध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा नियोजन बैठक संपन्न
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या उद्या जामखेड तालुक्यात येणाऱ्या स्वाभीमान जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली यात आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष उपस्थित होते पण शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच काँग्रेस पक्षाची अनुपस्थिती जाणवली.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, संजय वराट, वैजीनाथ पोले, सुर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, उमर कुरेशी, अमित जाधव, राजेंद्र गोरे, आपचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, बाबाजी तरडे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर चेअरमन, हंगा सरपंच राजेंद्र शिंदे, उपसरपंच गणेश साळवे, मुकुंद दळवी, प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची रूपरेषा
मंगळवार दि. ९ रोजी सकाळी ९ . ०० वा. खर्डा येथून सुरूवात, सकाळी अकरा वाजता नायगाव, दुपारी बारा वाजता राजुरी, तीन वाजता नान्नज, सायंकाळी चार वाजता जवळा, सायंकाळी सहा वाजता चौंडी, सायंकाळी सात वाजता जामखेड शहरात सभा होईल यानंतर दोन दिवस कर्जत येथे जनसंवाद यात्रा असणार आहे.
स्वाभिमानी जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाडी वस्ती, गावा गावात जाऊन जनजागृती केली आहे तसेच चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
चौकट
निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा नियोजनासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आपचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले हजर होते पण शिवसेना उद्धव ठाकरे गट व कांग्रेसचे पदाधिकारी गैरहजर होते. उद्या पासून सर्व मित्रपक्ष हजर राहतील असे विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले.