जामखेड न्युज——
जामखेड तालुक्याचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत डंका
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 मध्ये आदरणीय गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ साहेब यांची प्रेरणा आणि आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ही आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनी नी साठी अभिमानाची बाब आहे.
नवोदय यशाचे शिरोमणी
1)सोहम रामनाथ ढाकणे
100 पैकी 100 गुण पटकावले आहेत.
2)उत्कर्ष रामेश्वर ढवळे
3)शिवसंस्कार दशरथ बिरंगळ
4)आदित्य अभिमान घोडेस्वार
5)शौर्य विकास हजारे
6)अर्णव सुभाष ओमासे
7)अर्णव चंद्रकांत गाडेकर
8)सायली रामहरी जगताप
9) शौर्य ब्रह्मदेव हजारे
या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
एकूण 80 जागांपैकी 9 जागा एकट्या जामखेड तालुक्याने पटकावल्या आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षक बंधू भगिनींचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडची शैक्षणिक प्रगती होत आहे. यामुळे च नवोदय प्रवेश परीक्षेत नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.