जामखेड न्युज——
कर्मचारी हिताचा जुनी पेन्शन प्रस्ताव पुर्ण केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार
जूनी पेंशन प्रस्ताव पुर्ण केल्याबद्द्ल जूनी पेंशन हक्क संघटनेच्या जामखेड तालुक्याच्या वतीने तालुक्याचे गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच आभार मानण्यात आले.
1 नोव्हेबर 2005 च्या आधी /जाहिरात असणाऱ्या बांधवांना नुकत्याच निघालेल्या शासननिर्णयाने जूनी पेंशन लागू झाली आहे.जिल्ह्यातील नियुक्त शिक्षक 19 व 5 आंतरजिल्हा बदली करून आलेल्या बांधव व भगिनीचे असे एकूण 24 जनांचे प्रस्ताव* काम आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणधिकारी मा श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या सहीने आज पुर्ण करण्यात आले.या कामी कार्यालयाकडून सर्वोतपरी सहकार्य केल्याबद्द्ल आदरणीय साहेबांचे जूनी पेंशन हक्क संघटना व सर्व शिक्षकांच्या वतिने मनस्वी आभार मानले.
आज सकाळपासूनच जूनी पेंशन संघटनेचे उच्चाधिकार समितिचे जिल्हाध्यक्ष केशवराज कोल्हे, तालुकाध्यक्ष अविनाश नवसरे, कार्याध्यक्ष रामहरी बांगर, कोषाध्यक्ष अतुल कोल्हे,संजयजी उंडे, जगन्नाथ राऊत, शेखर घूमरे,सागर माकूड़े,अमोल पवार,बालाजी चव्हाण,प्रवीण पवार, बळीराम कदम इ. यांनी 24 जणांचे सेवा पुस्तक,त्यातील नोंदी व प्रस्ताव तपासून चेक करण्यात आले.हे काम सायंकाळी उशिरापर्यत चालले.
दिवसभर कामात व्यस्त असून सुद्धा संध्याकाळी शिक्षकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साडेसात वाजेपर्यत ऑफिस मध्ये थांबून हे प्रस्ताव परिपूर्ण करून घेतले.
आपल्या लहान बांधवांच्या जीवनातील या आनंदाच्या क्षणी शिक्षक बँकेचे संचालक श्री संतोषकुमार राऊत व दिवसभर या कामी विशेष परिश्रम घेणारे विकास मंडळाचे विश्वस्त मा.श्री. मुकुंदराज सातपुते यांनी सर्वाना पेढ़े वाटप केले.
सर्वाना शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी शिक्षक नेते नारायण राऊत हे सुद्धा आवर्जुन उपस्थित होते.
या प्रसंगी मोठ्या आज़ाराशी लढून खास या प्रस्ताव कामासाठी उपस्थित राहणारे शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक मा.श्री.प्रतापराव गांगर्डे साहेब यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.