नगरचे जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता देशमुख यांचे निलंबन अखेर रद्द

0
648

जामखेड न्युज——-

नगरचे जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता देशमुख यांचे निलंबन अखेर रद्द

 

जलसंपदा विभागातील कार्यकारी अधिकारी किरणकुमार देशमुख यांच्या निलंबनावरून माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यात चांगलेच वादंग रंगले होते. भाजप अंतर्गत कलह समोर आला होता. आता परत निलंबन रद्द झाले आहे.

जलसंपदा विभाग कुकडी प्रकल्पातील श्रीगोंदा विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अधिकारी किरणकुमार देशमुख यांचे निलंबन तेरा दिवसांत शासनाने रद्द केले. देशमुख यांना नाशिक येथील कालवा संकल्पचित्र विभाग क्रमांक दोनमध्ये कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती देण्यात आली.

याबाबतचे लेखी आदेश जलसंपदा विभागाचे सहायक सचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी काढले आहेत. सीना तलावातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या कारणावरून कुकडी प्रकल्पातील कार्यकारी अभियंता किरणकुमार देशमुख यांच्याबाबत आमदार प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. जलसंपदा विभागाने किरण देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश २३ फेब्रुवारीला काढले होते.देशमुख यांची या प्रकरणी गंभीर चूक अथवा हलगर्जीपणा दिसत नाही.

असे म्हणत त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ६ मार्चला त्यांचे निलंबन रद्द करून नाशिक येथील कालवा संकल्पचित्र विभाग क्रमांक दोनमध्ये कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती देण्यात आली.

माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी शेतीसाठी सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या मागणीवर कार्यवाही न झाल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारीला यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीत माजी पालकमंत्री शिंदे हे आक्रमक झाले होते. कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची मागणी त्यांनी लावून धरली होती. परंतु कारवाई झाली नाही.

यावरून त्यांनी नगर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनामधील विसंगत कारभारावरून सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह समोर आला होता. आता परत निलंबन रद्द झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here