Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आठ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जामखेडची कार्यकारीणी जाहीर होणार –...

आठ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जामखेडची कार्यकारीणी जाहीर होणार – उमेश पाटील कर्जत जामखेडची जागा अजित पवार गटच लढविणार

0
1321

जामखेड न्युज——

आठ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जामखेडची कार्यकारीणी जाहीर होणार – उमेश पाटील

कर्जत जामखेडची जागा अजित पवार गटच लढविणार

 

कर्जत जामखेडची विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार गटच लढविणार असून सक्षम उमेदवार देऊन विजय मिळवणारच असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केला.

उमेश पाटील हे आज जामखेड येथे भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलन कर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी विश्रामगृह पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक महेश निमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या सोनवणे, तुषार बोथरा, बापुसाहेब शिंदे, जानकीराम गायकवाड (मामा), पै. राजू शेख, गोरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, विद्यमान आमदाराचा पराभव आमचाच उमेदवार करणार एक सक्षम उमेदवार देत कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी आमचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल असे सांगितले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच लढत होईल असे चित्र दिसत आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात आमचे नेते अजित पवार स्वतः लक्ष घालणार आहेत. एक सक्षम उमेदवार देऊन विजयश्री खेचून मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असे सांगितले.

थोड्याच दिवसात कर्जत मतदारसंघात अजित पवार गटात शेकडो पक्ष प्रवेश होणार आहेत. आणि त्यावेळी पक्षाची कार्यकारीनी जाहीर केली जाईल असे सांगितले.

आमदार निलेश लंके यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले लंके हे लोकप्रिय आमदार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्य चांगले आहे. पक्ष कोणाला उमेदवारी देईल ते पाहू परंतु लंके हे सर्व सामान्य व लोकांच्या मनातील उमेदवार आहेत.

चौकट
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपा लढत झाली होती यात आमदार रोहित पवार ४२ हजार मतांनी निवडून आले होते तर भाजपाचे उमेदवार प्रा. राम शिंदे पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपा आपली जागा सोडेल का असा प्रश्न आहे. भाजपाने जागा सोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस लढत होईल हे येणाऱ्या काळात कळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!