जामखेड न्युज——-
राज्यग्रंथालय संचालनालय व नगर जिल्हा ग्रंथालय कार्यलयाच्या वतीने कवि पवारांचा सन्मानपत्र देऊन गौरव
नगर जिल्हा व जामखेडच्या लैकिकात भर
जामखेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता व काव्यसंग्रह राज्य व राज्याबाहेरील विविध विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमाला असल्याने नगर जिल्हयाच्या लौकिकात भर पडली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रशासनाच्या राज्यग्रंथालय संचालनालय व नगर जिल्हा ग्रंथालय कार्यलयाच्या वतीने राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या ग्रंथ उत्सवामध्ये सन्मानपत्र देऊन कवी पवार यांचा गौरव करण्यात आला.
आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता नांदेड ,नागपूर, अमरावती व मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आहेत.
तसेच त्यांचा ‘धूळपेर’ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शंभर गुणासाठी आहे. ‘धूळपेर’ काव्य संग्रहाला कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रस्तावना आहे.शेतकरी जीवन, महिला जीवन, सामाजिक, राजकिय व विज्ञान आणि निसर्ग विषयावरील कविता असल्याने हा काव्य संग्रह सामीक्षकांनी गौरविलेला आहे.
पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व छंदोबद्ध आहे. जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव झाल्याने प्रा. मधुकर राळेभात, डॉ जतीन काजळे, प्रा डॉ.सुभाष देशमुख,प्रा डॉ. येळवंडे लक्ष्मीकांत आदि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.