कालिका पोदार लर्न स्कूलच्या वतीने मराठी गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडी तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
306

जामखेड न्युज——

कालिका पोदार लर्न स्कूलच्या वतीने मराठी गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडी तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कालिका पोदार लर्न स्कुल जामखेडच्या वतीने शहरात ग्रंथ दिंडी तसेच
भारूड, ओवी, अभंग तसेच लेझीम प्रकार तसेच मराठी भाषेचे महत्त्व दाखवणारे विविध फलक हातात घेऊन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते.

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.

 

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समिक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.

ज्यात ‘विवेकसिंधू’ (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहीणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण होतो.

जामखेड मध्ये विविध ठिकाणी कालिका पोदार शाळेमार्फत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवीतील मुला- मुलींनी ढोल-लेझिम यावर ठेका धरला, त्यानंतर इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवकाळ दर्शवला, त्यानंतर ग्रंथपालखी, नंतर संत महिमा व शेवटी हातामध्ये मराठीचा गौरव घेऊन चाललेले इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी- विद्यार्थीनी प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते.

जामखेड मध्ये शितल कलेक्शन समोर नगररोड, शनीमंदिरासमोर मेन (पेठ), तहसील कार्यालय रोड या ठिकाणी मराठी दिना निमित्त विविध रंगी कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संत वाड्गमयातील विविध रंगाची उधळन प्रेक्षकांवर केली.

भारूड, ओवी, अभंगातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आणि त्यानंतर शाहिरी काव्य, ज्वलंत शिव महिमा आणि मराठी साहित्या मुरलेल्या धनगरी ओवीला शाहिरीसाज देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आणि आपल्या मराठी संस्कृती बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर उभे राहिले.

यावेळी कालिका पोदार लर्न स्कुलचे प्राचार्य प्रशांत जोशी, संचालक सागर अंदुरे, संचालक निलेश तवटे, शिक्षक वृंद, पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here