जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
श्री साकेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थी केशव तावरे यांनी विद्यालयाच्या प्रांगणात वड, कडुलिंब व चिंच या झाडांची लागवड करत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तावरे यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी व विद्यालयाने तावरे यांचे आभार मानले.
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, ज्ञानदेव मुरुमकर, केशव तावरे, केशव वराट, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अशोक घोलप, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे. परिसरात वडाचे झाड नसल्याने व वडाचे झाड अनेक दिवस टिकत असल्याने विद्यालयाचा माजी विद्यार्थी केशव तावरे यांनी शाळेसाठी वडाचे झाड दिले त्या झाडाची लागवड वटपौर्णिमेनिमेदिवशी करण्यात आली होती.
विद्यालय परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहता कडुलिंब व चिंचाची झाडे
चांगली येतील हे ओळखून आज शाळेच्या परिसरात या झाडांची लागवड करण्यात आली.