भाजपाच्या गाव चलो अभियानात युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांचा बांधखडक ग्रामस्थांशी संवाद

0
374

जामखेड न्युज——

भाजपाच्या गाव चलो अभियानात युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांचा बांधखडक ग्रामस्थांशी संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भाजपाच्या गाव चलो अभियान अंतर्गत विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी प्रत्येक भाजपा पदाधीकाऱ्यावर एका गावाची जबाबदारी देण्यात आली असून त्यानुसार भाजपा नेते माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नवनिर्वाचित युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे भाजपाच्या गाव चलो अभियान अंतर्गत विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.

बांधखडक ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच केंद्र शासन, राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना याबाबत चर्चा तसेच तळागाळापर्यंत योजना पोहचल्या मुळे झालेली प्रगती याबाबत संवाद साधला.

यावेळी युवा नेते भाजपा केशव वनवे, सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी पाटील, अनिल दराडे, भारत होडशीळ, अर्जुन दराडे,चेअरमन सखाराम वनवे, रोहित वनवे, सुशांत चव्हाण, छगन वनवे आदिंसह कार्यकर्ते व बांधखडक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


भाजपाच्या गाव चलो अभियान अंतर्गत जामखेड तालुक्यातील बांधखडक या गावची जबाबदारी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्याकडे देण्यात आली होती.

त्यानुसार त्यांनी गावातील युवक, वयोवृद्ध, मध्यमवयीन लोकांशी, संवाद साधुन, केंद्र व राज्य सरकारच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या प्रकारे तसेच मोदी की गांरटी, सशक्त शेतकरी, समृद्ध भारत. आयुष्यमान भारत, महिला शक्तिला नवी गती (सुकन्या समृद्धी योजना), मेट्रो रेल्वेची सुरूवात, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, पाच लाखापर्यंत मोफत विमा, समृद्धी महामार्ग समुद्रावरील सर्वात लांब पूल (अटल सेतु), कृषी कल्याण योजना, गडकिल्यांचे व तिर्थक्षेत्रांचे संवर्धन पी एम आवास योजना, अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम पूर्ण झाले.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये घट अशा विविध योजना व विषयांबद्दल माहिती दिली. यास बांधखडक येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here