जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार!!
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब यांनी तालुक्यातील शिक्षकांच्या अडी अडचणी समजून घेऊन शिक्षक संघटना यांना विश्वासात घेत अडचणीवर मार्ग काढला आणि अडीअडचणी सोडविल्या यामुळे शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती येथे तालूक्याच्या शिक्षकांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठीव त्यावर तात्काळ उपाय योजना करण्यासाठी तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या समन्वय समिती ची बैठक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सर्व प्रथम धनवे साहेब तालुक्यात आल्यापासून शैक्षणिक बदल मोठ्या प्रमाणात होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली आहे. त्याच बरोबर त्यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नही सोडविले आहेत. त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा व आभाराचा ठराव मांडण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बैठकीत मेडीकल बील, वरिष्ठ वेतन श्रेणी, एन्. पी.एस्. रकमा जमा करणे, अर्जीत रजा मंजूरी, निवड श्रेणी , सेवा पुस्तक अदयावत करणे आदि. विषयावर चर्चा झाली.
आतापर्यंत झालेल्या सर्व मिटींग मध्ये या मिटींगचे वैशिष्टे म्हणजे आजची मिटींग अतिषय खेळीमेळीच्या वातावरणात झाली . साहेबांनी वरील सर्व प्रश्नावर एक घाव दोन तुकडे या उक्ती प्रमाणे सर्व प्रश्नावर समाधानकारक पर्याय काढले व सहा शिक्षकांची टीम नेमली व सर्व्हिस बुक नोंदी, इतर काम करण्यासाठी सुचना दिल्या . शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची तळमळ पाहून शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे .
यावेळी राम निकम, संतोष राऊत, नारायण राऊत, मुकंद सातपुते , किसन वराट, डमाळे, नवनाथ बहीर, आष्टेकर, मोरे, महिला आघाडी अध्यक्षा श्रीम. अर्चना भोसले, सुनिल महामुद्रे, तागड अदि. मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात
जाहीर नोटीस लिलाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनवेवस्ती ता. जामखेड जि. अहमदनगर या शाळेच्या एका वर्गखोलीचे निर्लेखन मंजूर झाले आहे. सदर मालमत्तेतील लोखंड, दरवाजा, खिडक्या, फरश्या आदी वस्तुंचा जाहीर लिलाव आहे त्या स्थितीत करायचा आहे ;तरी ज्यांना लिलाव घ्यायचा आहे त्यांनी शनिवार दि.१०/२/२०२४ रोजी सकाळी १०. वाजता शाळेच्या आवारात उपस्थित राहावे. योग्य किंमत न आल्यास किंवा काही कारणास्तव लिलाव रद्द करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असेल.
टीप:लिलावापूर्वी बयाना रक्कम भरणे गरजेचे आहे.
आपले नम्र अध्यक्ष व सचिव शाळा व्यवस्थापन समिती वनवेवस्ती ता. जामखेड जि. अ. नगर