जामखेड न्युज——
चार महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट जामखेड शाखा बंद यामुळे ठेवीदार आक्रमक, उपोषण करण्याचा इशारा
तहसीलदार यांच्या मध्यस्थीने व्हाइस चेअरमनने मागितली आठ दिवसांची मुदत
जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि मध्ये गेल्या आनेक महीन्यांपासून हातावर पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. या मुळे ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत जामखेड चे तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात ठेवीदांचे पैसै मिळेले नाहीत तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील ठेवीदारांनी दिला आहे.
तहसीलदार यांनी ताबडतोब ज्ञानराधा संस्थेशी संपर्क साधला असता ज्ञानराधा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन कुलकर्णी यांनी तहसील कार्यालयात पत्र पाठवून कळविले आहे की, सध्या काही अपरिहार्य कारणामुळे पैसे देण्यास अडचण येत आहे तेव्हा येत्या दहा तारखेपासून आम्ही पहिल्या टप्प्यात पैसे परत देण्यास सुरुवात करणार आहोत तेव्हा आंदोलन करू नये सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळतील.
जामखेड येथे बीड येथील कुटे ग्रृप ची ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून आहे. या मध्ये अनेक ग्राहकांनी कोट्यावधी रुपये सेव्हिंग व मुदत ठेव पावतीच्या माध्यमातून मोठ्या विश्वासाने ठेवल्या आहेत.
मात्र गेल्या चार पाच महीन्यांपासून या ज्ञानराधा मल्टीस्टेटला टाळे लागल्याने गोरगरीब ठेवीदार या मल्टीस्टेटचे उंबरठे झीजवुन थकले आहेत. मात्र तरी देखिल या ठेवीदारांना एक रुपयाही मिळाल नाही.
आखेर याच अनुषंगाने जामखेड चे ॲडव्होकेट एन. आर. राजपुरे यांनी इतर ठेवीदारांना सोबत घेऊन आक्रमक पवित्रा घेत आज गुरवार दि १ फेब्रुवारी २०२४ रोजी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.बीड मध्ये माझे पैसै अडकले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून संबधित अधिकार्यांशी संपर्क करत ओहोत परंतु अधिकारी नॉटरीचेबल आहेत. तसेच बीडच्या इतर वरीष्ठ पदावरील अधिकारी यांनी स्वतःचे पैसै काढुन घेतले आहेत. त्यामुळे आमचा बँकेवर विश्वास राहीला नाही.
याबाबत दि ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंन्त आमचे पैसे मिळाले नाहीत तर ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या विरोधात तालुक्यातील पिडीत ठेविंदारांसह वकील बांधव व वकील संघ जामखेड यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील निवेदनात दिला आहे. या निवेदनावर ॲड .एन. आर. राजपुरे यांच्या सह जवळ जवळ साडेतीनशे ग्राहक व ठेकेदारांच्या सह्या आहेत.