जामखेड न्युज——-
आदिवासींच्या प्रश्नांसाठी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार यांनी घेतली विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार यांनी अदिवासी (भटक्या व पारधी) प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध प्रश्नांसाठी मागण्याचे निवेदन दिले तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जे अदिवासींचे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडवले जातील असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार यांनी जामखेड परिसरात अदिवासी पारधी समाजाचे अनेक मूलभूत प्रश्न सोडवले आहेत. अनेकांना कुपन, जातीचे दाखले मिळवून दिले आहेत. तसेच समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता विविध शासकीय योजना मिळवण्यासाठी अदिवासी नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरववाळ यांची भेट घेत प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे.
अदिवासी प्रश्नांसाठी मुंबई येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ भेट घेतली यावेळी फासे पारधी संघटना जिल्हाध्यक्ष अजित भोसले, राहुल भोसले (बेलवंडी) चेअरमन, सीमा चव्हाण, रत्नाताई, संतोष पिंपळे, गणेश काळे, लक्ष्मीताई पवार, आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नरहरी झिरवाळ साहेब म्हणाले की, आपण एक मीटिंग करून जे आदिवासी समाजाचे प्रश्न असतील ते मार्गी लावू व त्या कोणत्याही आदिवासी समाजाचे प्रश्न असो त्यांनी कधीही माझ्याशी व लक्ष्मीताई पवार यांच्याशी कधीही संपर्क करू शकता असे आश्वासन दिले.
नरहरी झिरवाळ यांची साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवाळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या बंडामुळे आणि आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे नरहरी झिरवळ अचानक चर्चेला आले आहेत. राज्यात विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जबाबदारी झिरवळ यांच्याकडे आली आहे.
परिसरातील अदिवासी प्रश्नांसाठी मुंबई येथे नरहरी झिरवाळ यांची भेट घेत सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी पवार यांनी प्रश्न सोडविण्याचा चंग बांधला आहे यामुळे जामखेड परिसरातील अदिवासी समाजाने समाधान व्यक्त केले आहे.