जामखेड न्युज——
श्री. साकेश्वर दातांच्या दवाखान्याच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत दंततपासणी शिबीर
निरोगी व निखळ हास्य खुलवेल आपले सौंदर्य या युक्तीप्रमाणे, वर्षभरात आपल्या उत्कृष्ट सेवेने परिसरात नावलौकिक करणारे डॉ. धनश्री जालिंदर वराट यांच्या श्री. साकेश्वर दातांच्या दवाखान्याच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत दंततपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. धनश्री वराट यांच्या श्री साकेश्वर दाताचा दवाखान्याच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रकारचे उपचार व सर्जरी माफक दरात केले जाणार आहेत.
दि. २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. धनश्री वराट यांनी केले आहे.
रूट कँनल ट्रिटमेंट, कँप/ ब्रिज बसवणे, दातासारखे सिमेंट भरणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, कवळी बसवणे, दात काढणे, लहान मुलांच्या दातावर उपचार, डिजिटल एक्स रे, दात साफ करणे या सह इतर उपचार माफक दरात करण्यात येणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी आपल्या दातांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी डॉ. धनश्री वराट बीड रोड कोठारी काँम्प्लेक्स येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.