आता शालेय मुलांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार शाळांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आरोग्यमित्र उमेश घोडेस्वार यांच्याशी संपर्क साधा

0
158

जामखेड न्युज——–

आता शालेय मुलांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार

शाळांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आरोग्यमित्र उमेश घोडेस्वार यांच्याशी संपर्क साधा

 

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत सर्वसामान्य व्यक्तीला रुपये पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळावे यासाठी केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.


त्याप्रमाणे आता शालेय विद्यार्थ्यांनाही आयुष्यमान योजनेचाही लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत योजनेचे प्रतिनिधी आरोग्यमित्र श्री उमेश घोडेस्वार यांनी जामखेड तालुक्यातील विविध शाळेमध्ये (ल ना होशिंग शाळा, जि .प .मराठी मुलांची शाळा, जि .प .तपनेश्वर मुलांची शाळा, जिल्हा परिषद सदाफुले वस्ती शाळा, जिल्हा परिषद महादेव गल्ली शाळा, या ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढून दिले आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कार्ड काढावयाचे असतील तर आवश्य संपर्क करा कार्ड काढून मिळतील माझा फोन नंबर 9028027206 असा आहे. योग्य मार्गदर्शन मिळेल असे उमेश घोडेस्वार यांनी सांगितले.


या योजनेअंतर्गत 1209 प्रकारचे मोफत उपचार व शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.


आयुष्मान कार्डला गोल्डन कार्ड सुद्धा म्हटले जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना असेही कार्डवर आहे.

आपल्या देशातील सर्व वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केलेली आहे. हि योजनाच म्हणजे आयुष्मान भारत योजना होय. हि जगातील मोठी आरोग्यविषयक योजना असून या योजनेद्वारे कोट्यवधी लोक यातून लाभ घेणार आहेत.

या योजनेद्वारे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. हि योजना मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी सुरु केली असून तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालीलप्रमाणे अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here