जामखेड न्युज ——–
बालकांना बचतीच्या सवयीसाठी एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना

एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबविले जातात, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी कर्जपुरवठा तसेच आता सहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी बचतीची सवय लागावी म्हणून ए. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही राज्यातील पहिलीच योजना आहे.

शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून बचतीची सवय लागावी तसेच बँकेचे व्यवहार समजावेत म्हणून रमेश गुगळे यांच्या संकल्पनेतून एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना राबविण्यात येत आहे तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

भविष्याची चिंता आजपासून कमी करा, तुमच्या खिशात उरलेली एक नोट दररोज तुमच्या पाल्याच्या बचत खात्यात टाका मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल असे सांगण्यात आले.
या योजनेविषयी एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश गुगळे, शाखाधिकारी वैभव कुलकर्णी, श्याम पंडित, जुबेर खान उपस्थित होते.

पतसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत दुर्बल घटकातील अडीच हजार महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. आता सहा ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही अभिनव बचत योजना आणली आहे. या बचतीवर सहा टक्के व्याजही मिळणार आहे तसेच मुलींना ६.५ टक्के व्याज मिळणार आहे.

गुंतवणूक करायची असेल तर ती अगदी मोठी रक्कम गुंतवणे गरजेचे असते असे नव्हे. “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी छोटीशी रक्कम जरी गुंतवायला सुरुवात केली तरी तुम्ही काही वर्षानंतर तुमच्या कडे शिक्षणासाठी चांगली रक्कम जमा होईल तेव्हा या योजनेचा लाभ घ्यावा असे गुगळे यांनी सांगितले.

२६ जानेवारीला या बचत योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी खातेदार बालक, पालक उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल असे सांगितले.









