माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची ढगफुटी झालेल्या गावांना बैलगाडीने जात पहाणी करून दिले पंचनामे करण्याचे आदेश

0
325
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड तालुक्यातील सोनेगाव परिसरात ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. मोठय़ा प्रमाणावर शेती व पीके वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या भागात आज माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची बैलगाडी, पायी व मोटारसायकल वर भेट देऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले
तालुक्यातील सोनेगाव, धनेगाव, दौंडाचीवाडी ,वाघा व परिसरात मोटरसायकल , बैलगाडी , पायी शेतात ,जाऊन पाहणी केली या गावांतील शेतकऱ्यांचे ढगफुटी व अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून शेत व पीक वाहून गेले आहेत त्यामुळे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी बैलगाडी, पायी व मोटारसायकलवर केलेला पाहणी दौरा आज संपुर्ण तालुक्यात एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
    यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, जवळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा सोमनाथ पाचरने, उपसभापती रवी दादा सुरवसे ,आरनगावचे सरपंच लहु शिंदे, सातेफळ सरपंच गणेश लटके, वंजारवाडी सरपंच डॉ खोत, वाघा सरपंच डॉ. जगदाळे, सोनेगाव सरपंच पद्माकर बिरंगळ,चत्रभुज बप्पा बोलभट, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here