जामखेड न्युज——
पाचच महिन्यात जामखेडमध्ये डॉक्टर्स असोसिएशनमध्ये उभी फुट,
दुसरी कार्यकारीणी जाहीर
पाच महिन्यांपूर्वी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनची निवडणूक झाली होती यात अध्यक्षपदी डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ.अनिल गायकवाड, डॉ.मनिषा राळेभात तर सचिव म्हणून डॉ. पांडुरंग सानप हे बहुमताने निवडून आले होते. यात ज्यांचा पराभव झाला त्यांनी पाचच महिन्यात दुसरी कार्यकारीणी निर्माण केले आहे.
३ आँगस्ट २०२३ रोजी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनची निवडणूक झाली होती. जामखेड तालुक्यात डॉक्टर असोसिएशनचे १५८ सदस्य आहेत. यामध्ये अध्यक्ष पदासाठी डॉ. संजय राऊत यांना ८२ मते तर सादेक पठाण यांना ६७ मते मिळाली होती, उपाध्यक्ष पदी डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. अनिल गायकवाड व डॉ. मनिषा राळेभात यांची तर सचिव पदी डॉ. पांडुरंग सानप व कोषाध्यक्ष पदी डॉ. विद्या काशिद यांची निवड झाली होती. पराभूत मंडळींनी एकत्र येऊन पाचच महिन्यात दुसरी कार्यकारीणी जाहीर केली आहे. यामुळे इतरांप्रमाणेच डॉक्टर मध्येही आता दोन संघटना झाल्या आहेत.
निवडणुकीनंतर पाचच महिन्यात दुसरी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.
काही डॉक्टर्स मंडळींनी एकत्र येत जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली असून या संघटनेची प्रथम कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सिताराम ससाणे तर सचिवपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. सिताराम ससाणे सचिव डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष (महिला) डॉ. विशाखा देवकर, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकिरण भोसले, कार्यकारी सदस्य डॉ. सुशिल पन्हाळकर, कार्यकारी सदस्य डॉ. विकी दळवी या सर्वांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुतन जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे पत्रकार दिन, जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
राजकीय पक्ष, पत्रकार संघटना याप्रमाणे आता डॉक्टर असोसिएशनच्या पण दोन संघटना झाल्या आहेत. पहिल्या संघटनेने सांगितले की, पराभव सहन झाला नाही म्हणून दुसरी संघटना तालुक्यातील डॉक्टर यांना विश्वासात न घेता पाच सहा जणांनी केलेली आहे.
तर आम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करून आमची संघटना स्थापन केली आहे. यामुळे आमची संघटना अधिकृत आहे.