जामखेड महावितरणचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, शहरात वर्दळीच्या ठिकाणी मुख्य वीज प्रवाहाच्या तारा झाडे व वेलींच्या गराड्यात

0
414

जामखेड न्युज——

जामखेड महावितरणचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, शहरात वर्दळीच्या ठिकाणी मुख्य वीज प्रवाहाच्या तारा झाडे व वेलींच्या गराड्यात

 

जामखेड महावितरण विभागाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे. अनेक लोकांच्या वाढीव वीजबील, तसेच बंद मीटर या तक्रारी बरोबर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मुख्य वीजपुरवठा करणाऱ्या तारांना झाडे व वेलींच्या गराड्यात सापडल्या आहेत यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो पण महावितरण याकडे कानडोळा करत आहे.


शहरातील बस डेपो परिसरात लोकांची मोठी वर्दळ असते तसेच बस दुरूस्तीचे काम याच झाडांच्या आसपास सुरू असते या झाडांच्या वरून शहराला वीजपुरवठा करणाऱ्या तारा आहेत झाडांबरोबर वेलींच्या गराड्यात या तारा सापडल्या आहेत. यामुळे झाडे व वेलीत वीजपुरवठा उतरून मोठा अनर्थ होऊ शकतो.

याबाबत संबंधित जवळ असणारे दुकानदार तसेच घरमालक यांनी सांगितले की, आम्ही वारंवार महावितरण विभागाला सांगितले आहे. अर्जही दिले आहेत पण महावितरण म्हणते तारांवरील वेली व झाडे काढणे आमचे काम नाही मग कोणाचे काम आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी महावितरण विभाग झोपेचे सोंग घेत आहे. जामखेड महावितरण कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ सुरू आहे. अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसणे, फोन न घेणे, बील दुरूस्ती अर्ज करूनही बील दुरूस्ती न करणे, अव्वाच्या सव्वा बीज बील आकारणी, नादुरूस्त मीटरसाठी दीड ते दोन हजार रुपये ग्राहकाकडून उकळणे, वारंवार बत्ती गुल होणे असे प्रकार जामखेड शहरात सर्रास सुरू आहे. यामुळे ग्राहकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर आता झाडे व वेलींच्या गराड्यात तारा सापडल्या आहेत.

जामखेड शहरासह तालुक्यात जादा बील आले म्हणून ग्राहकांना वारंवार महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात पण अधिकारी भेटतच नाहीत. रजेवर आहेत, दुपारी येतील असे सांगितले जाते अधिकारी फोनही उचलत नाहीत. ग्राहक चकरा मारून हैराण होतात.

महावितरण च्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here