जामखेड न्युज——
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रामकृष्ण सेवाश्रम शिऊर तर्फे भैरवनाथ विद्यालयास खाऊ वाटप
राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रामकृष्ण सेवाश्रम शिऊर तर्फे श्री भैरवनाथ विद्यालयातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
आज श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिऊर या ठिकाणी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी उमेश काका देशमुख, ह. भ. प. गणेश महाराज, डॉ. गायकवाड, गुंदेचा साहेब पितळे काका, शाळेचे मुख्याध्यापक रत्नपारखी सर, आरोळे सर, पोकळे सर, भांगरे मॅडम, तनपुरे सर, लिपिक किरण देवकाते हजर होते.
गावातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, यानंतर मुलाची भाषण झाली. सूत्रसंचालन पोकळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन आरोळे सर यांनी केले. हा कार्यक्रम रामकृष्ण सेवाश्रम व भैरवनाथ माध्य. विद्या. शिऊर यांच्या संयुक्त विध्यमाने झाला.
सेवाश्रमच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.