जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख आणी महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना संपर्कमत्री नामदार दादाजी भुसे, संपर्क प्रमुख मा. संजय घाडी सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख मा.राजेंद्र दळवी यांनी प्रविण अनभुले यांच्यावर विश्वास दाखवुन आज त्यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणुन नियुक्ती केली.

प्रविण अनभुले यांनी आतापर्यंत शिवसेना संघटक वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचवले आहे. तसेच कोरोना महामारी काळात त्यांनी अनेक लोकांना औषधे, बेड तसेच इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे अनेक रूग्णांचा जीव वाचला तसेच गोरगरीब लोकांना मदत करण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात.
नामदार दादाजी भुसे आणी नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज मला निवडीचे पत्र दिले.
यावेळी बोलताना अनभुले म्हणाले की, पक्षाने माझ्या वर जो विश्वास दाखवला त्याला मी पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणी शिवसेनेचे ध्येय धोरण तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त केला.