जामखेड न्युज——
शंभूराजे कुस्ती संकुल मार्फत मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारे तसेच अनेक सामाजिक कामात पुढाकार घेणारे शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे तेव्हा या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंगेश आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ( माँसाहेब) यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले.
रक्ताचा थेंब कोणाचातरी जीव वाचवू शकतो
आधुनिक काळात रक्ताची नितांत गरज असते हे ओळखून शंभूराजे कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मंगेश आजबे यांनी गेल्या नऊ वर्षापासून राजमाता जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
यावेळी बोलताना मंगेश (दादा) आजबे म्हणाले की, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच भव्य रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शंभूराजे कुस्ती संकुल च्या वतीने मंगेश कन्ट्रक्शन आँफीस शेजारी नगर रोड जामखेड
भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.