जामखेड न्युज——
जागतिक एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालयचे जाणीव जागृतीपर कार्यक्रम संपन्न-योगेश अब्दुले
जागतिक एच.आय.व्ही.एड्स सप्ताहानिमित्त ०१ ते ०७ डिसेंबर २०२३ दरम्यान विविध जाणीव जागृतीच्या कार्यक्रमांचे आयोजन स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प,दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र शासन व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अ.नगर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने एच.आय.व्ही विषाणूविषयी जनजागृती, कलंक आणि भेदभाव,हक्क-अधिकार,सामाजिक प्रतिष्ठा याबाबतज्ञ शाळा, महाविद्यालय, समाजामध्ये जाणीव जागृती करण्यात आली. अशी माहिती स्नेहालय जिल्हा समन्वयक तथा महिला व बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी दिली.
‘होऊया सारे एकसंघ करूया एच.आय.व्ही चा प्रतिबंध’ या ब्रीदवाक्यनुसार एच.आय.व्ही./एड्स बाबत स्वतःची स्थिती जाणून घेऊन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या मार्गदर्शनाने जामखेड शहरात जनजागृती रॅली काडून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती एच.आय.व्ही/एड्स आणि गुप्तरोग विषयी तहसील कार्यालय येथे पथनाट्य सादर करण्यात आले.ल.ना.होशिंग कनिष्ठ महाविद्यालय येथे जामखेड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी तारुण्यातील जबाबदारी एच.आय.व्ही./एड्स ची खबरदारी व कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले.
टच ऍण्ड ट्राय प्रोग्राम हा उपक्रम लोककलावंत महिला,आणि अतिजोखिम करणाऱ्या समुदायासाठी निरोध (कंडोम) विषयी असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी स्पर्श आणि प्रयत्न याविषयी प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.या कार्यक्रमाला समुपदेशक योगेश अब्दुले,क्षेत्रीय अधिकारी मजहर खान,सुप्रिया कांबळे मार्गदर्शन केले.श्री नागेश कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.किशोर बोराडे,सुप्रिया कांबळे यांचे एच.आय.व्ही./एड्स मुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम याविषयावर व्याख्यान झाले.
देह व्यापारातील बळी महिलांकरिता जिल्हास्तरीय वीर रणरागिणी महिला मेळाव्या व सहजीवनाची ओढ असणाऱ्या एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन स्नेहालय पुनर्वसन संकुल अ.नगर येथे करण्यात होते.एच.आय.व्ही./एड्स याविषयी सखोल माहितीसाठी आय.टी.आय.येथे डॉ.चंद्रकांत मोरे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मिळाले.जामखेड महाविद्यालय येथे प्रा.तुकाराम घोगरदरे यांचे एच.आय.व्ही./एड्स तरुणाई आणि भारतासमोरील आव्हाने यावर व्याख्यान झाले.अतिजोखमीचे वर्तन असणारे लक्ष गटातील महिलांसाठी एच.आय.व्ही/एड्स’चा प्रतिबंध यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज खराडे व्याख्यान झाले.एड्स सप्ताह यशस्वीतेसाठी क्षेत्रिय अधिकारी मजझर खान,समुपदेशक सुप्रिया कांबळे,सादिका शेख,सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद,समीक्षा अब्दुले यांनी विशेष प्रयत्न केले.
चौकट-या सप्ताहाची सांगता दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी एच.आय.व्ही./एड्स संसर्गित व्यक्तीसाठी नवी उमेद-नवी आशा-नवे जीवन सुहाय्य करण्यासाठी सहजीवनाची ओढ आहे अशा जोडप्यांच्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन स्नेहालय पुनर्वसन संकुल अ.नगर येथे करण्यात आले होते.संपूर्ण भारतामध्ये अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन आत्तापर्यंत फक्त स्नेहालय संस्थेअंतर्गतच होत आहे अशीही माहिती स्नेहालय जिल्हा समन्वयक महिला व बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी दिली.