सत्तावीस वर्षापासून सुरू असणारी बस बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांच्या हाल बस सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार

0
655

जामखेड न्युज——

सत्तावीस वर्षापासून सुरू असणारी बस बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांच्या हाल

बस सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार

 

 

जवळा ते अहमदनगर ही गेल्या सत्तावीस वर्षापासून सुरु असलेली एस टी बस ही गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सदरची बस चालु करण्यासाठी पिंपरखेडचे सरपंच व ग्रामस्थांनी जामखेड आगारव्यवस्थापक यांना निवेदन देऊन बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. खाजगी प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

या बाबतचे निवेदन पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे सह ग्रामस्थ उपस्थित होते. आज सोमवार दि १८ डिसेंबर २०२३ रोजी आगारव्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील जवळा येथुन जवळा ते अहमदनगर ही एस टी बस प्रवाशी व विद्यार्थीसांठी गेल्या सत्तावीस वर्षांनपासुन सुरू होती मात्र ही बस एस टी महामंडळाकडून गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे.

परीणामी जवळा, हळगाव, पिंपरखेड हसनाबाद, अरणगाव, मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थींची हेळसांड होत आहे. जवळ जवळ या बसने प्रवास करणाऱ्या दिडशे विद्यार्थ्यांकडे बसचे मासीक पास आहेत. मात्र सध्या सर्व विद्यार्थी हे खाजगी बसने प्रवास करत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे १५० विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

यामुळे बंद करण्यात आलेली जवळा ते अहमदनगर एस टी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी पिंपरखेड चे सरपंच राजेंद्र ओमासे व सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे सह ग्रामस्थांनी आगारव्यवस्थापक शशी खटावकर यांच्याकडे करण्यात आली आहे. जर ही बस लवकरात लवकर सुरू केली नाही पिंपरखेड ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here