जामखेड न्युज——
पाडळी फाटा येथील अर्ध्या तासात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जखमी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची मदत
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर पाडळी फाटा येथे मोटर सायकल अपघात होऊन जामखेड शहरातील राहुल अजिनाथ हजारे वय 35 व गणेश दिनकर वराट वय 33 राहणार जामखेड हे जखमी झाले तर नंतर अर्ध्या तासात दुसऱ्या अपघातात लक्ष्मण गोविंद बेद्रे व 45 राहणार बेदरेवाडी ता. पाटोदा हे गंभीर जखमी झाले.
राहुल हजारे व गणेश वराट हे करमाळ्याहून जामखेडला येत असताना राजदीप हॉटेल समोर मोटरसायकल समोर धडकून अपघात झाला यामध्ये दोघेही गंभीर जखमी आहेत एकाला जबर मार लागला आहे. अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे
तसेच दुसरा अपघात अर्ध्या तासाच्या फरकावरच पाडळी फाट्यावरच झाला यामध्ये लोकसेवा मंगल कार्यालय समोर लक्ष्मण गोविंद बेद्रे व 45 राहणार बेदरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड हा जबर जखमी झाले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शहाजीराजे भोसले, शिवाजी लटपटे,ऋषिकेश वाटाणे याचा फोन आला संजय कोठारी यांनी ताबडतोब दीपक भोरे ,सुनील मोरे यांना रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल केले आणि या तिघांना दवाखान्यात आणून यांचे प्राण वाचवले