भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार समारंभ

0
188
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज- – – (सुदाम वराट) – 
  कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे तसेच त्यांचा संपुर्ण स्टाफ यांनी गेल्या चौदा महिन्यांपासून आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम करत कोणतेही महागडे औषध न वापरता अगदी मोफत उपचार करत सुमारे सहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्णांवर यशस्वी उपचार करत बरे केले त्यामुळे त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे म्हणून जामखेड तालुका युवा मोर्चाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार समारंभ आयोजित केला होता.
     कोरोना काळामध्ये जामखेड तसेच परिसरातील गावांमध्ये आजाराने थैमान घातला होता अशावेळी सर्वसामान्य जनतेला या महामारी मध्ये ज्यांनी बाहेर काढले असे आपल्या जामखेड मधील डॉ.रविदादा आरोळे व डॉ.शोभाताई आरोळे तसेच त्यांचे सहकारी यांचा मोलाचा सहभाग आहे याच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले यांनी सर्व डॉक्टर तसेच या हॉस्पिटलचे संचालक रविदादा आरोळे व शोभाताई आरोळे व त्यांचे सहकारी यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला.
          प्रसंगी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य अनिल लोखंडे, उपसभापती रवि सुरवसे,
माजी पंचायत समितीचे सभापती व विद्यमान सदस्य भगवान मुरूमकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, सुधीर राळेभात, तात्याराम पोकळे, पांडुरंग उबाळे, लहु शिंदे, मोहन गडदे, माऊली जायभाय, भागवत सुर्वसे, दत्ता चिंच्कर, सागर सोनवणे, बजिराव गोपळघरे, कांतीलाल खिवसरा, उदय पवार, धनंजय गावडे, संतोष हजारे, गौतम हजारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here