ल.ना.होशिंग विद्यालयात चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

0
291

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग विद्यालयात चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

 

एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धा ल. ना.होशिंग विद्यालयात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे, प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी हजर होते.


आज शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाल्या.


या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध उद्योगपती वैभव कुलकर्णी व जुबेर खान पठाण उपस्थित होते.त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे,शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाशिक्षक राऊत मुकुंद यांनी केले. या स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहेत.विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेची अतिशय आनंदाने वाट पाहत असतात.


सुरुवातीला ही स्पर्धा ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घेण्यात येत होती नंतर दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील राजुरी,साकत,हळगाव व जामखेड या चारही ठिकाणी घेण्यास सुरुवात झाली व या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होतआहेत. एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने विद्यार्थ्यांना चित्रकलेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


विद्यार्थ्यांना आपल्या मनातील विचार विषयानुसार रंगरेषांच्या सहाय्याने रेखाटता येतात व चारही शाखेमधून स्वतंत्र पद्धतीने इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा घेतल्या जातात, सर्व शाखांमधून स्वतंत्र प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून दिले जातात.

त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटक वैभव कुलकर्णी यांनी चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर जुबेर खान पठाण यांनीही या स्पर्धेचे अतिशय व्यवस्थित नियोजन केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे प्राचार्य श्रीकांत होशिंग कलाशिक्षक राऊत मुकुंद व सर्व शिक्षक व विद्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले.

त्यानंतर प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगता मधून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या स्पर्धेच्या निमित्ताने मोठी संधी मिळते. त्याचबरोबर काळाला अनुसरून समाजाच्या हिताचे विषय या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थी हाताळतात… नकळत त्यांच्यामध्ये कला बीज रोवले जावे हेच व व्यापारी दृष्टिकोन वाढीस लागावा असाच या चित्रकला स्पर्धेच्या विषयांचे उद्देश आहे असे वाटते. विद्यार्थ्यांच्या अंगी चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने टापटीपपणा,नीटनेटकेपणा व एकाग्रता याही गुणांमध्ये वाढ होते. विद्यार्थ्यांना एक वेगळा अतिशय गोड असा अनुभव येतो. स्पर्धा आयोजकांना धन्यवाद देऊन विद्यालयातील सर्व क्रिएटिव्ह अद्यापक यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल अभिनंदन केले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक राऊत मुकुंद,श्रीमती दराडे मॅडम, अनिल देडे, भरत लहाने,पोपट जगदाळे,कैलास वराट,विशाल पोले,रोहित घोडेश्वार,हनुमंत वराट,विजय क्षीरसागर,आदित्य देशमुख,पंकज पोकळे,साई भोसले व सर्व मॅडम यांनी प्रचंड मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले व आभार उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here