जामखेड न्युज——
घरकुल एकाचे ताबा दुसऱ्याचा नान्नज मधील प्रकार
दोषींवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार -सुनील साळवे
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२०२२ अंतर्गत नान्नज येथील घरकुल मध्ये संगनमताने बेघरांना घर देण्याचा शासनाचा उद्देश धाब्यावर बसवून जवळच्या व्यक्तीस दोन घरकुलाचा ताबा देण्यात आला.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील लाभार्थी सतीश महादेव मोहळकर व नवनाथ अंकुश मटकर यांना घरकुल मंजूर झाले होते परंतु त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती असे त्यांच्याकडून शंभर रुपये चे स्टॅम्प पेपर लिहून घेण्यात आले व महमद बादशाहा कुरेशी यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नान्नज ग्रामपंचायत मिळकत नंबर ७४१/१ मध्ये ७५/१२ आकाराची जागा आहे माझ्या मालकीच्या घरजागेत सतीश महादेव मोहळकर व नवनाथ अंकुश मटकर यांना घरकुल बांधण्यास माझे काय हरकत नाही.
असे संमती पत्र दिले वरील लोकांची संमती पत्र ग्रामविकास अधिकारी यांनी लिहून घेऊन त्या घरजागेचे काम फायनल करण्यात आले आहे व ग्रामपंचायत उताऱ्यावर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना २०२१-२२ आरसीसी इमारत १५/२० अशी दोन्ही घरकुलांची नोंद करण्यात आली आहे जागा ७५/१२ एवढी असताना १५/२० नोंद कोणत्या आधारावर केली ? घरकुल बांधकामास शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरील संमती बेकायदेशीर आहे खरेदीखत किंवा रजिस्टर समती पत्र घेणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक चुकीचे रेकॉर्ड तयार करून लाभार्थ्यांना घराचा कागदोपत्री ताबा देण्यात आला असून वरील दोन्ही घरांमध्ये महंमद बादशहा कुरेशी यांचाच ताबा व रहिवास असून संगनमताने शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे व बेगर लाभार्थ्यांना त्यांच्या शासनाने दिलेल्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर दहा दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आंदोलनाच्या परिणामाची जबाबदारी संबंधित शासनाची व अधिकाञाची राहील असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अ. नगर, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे.
चौकट ———
गरजू गरीब बेघर लाभार्थ्याचे दोन घरकुल घातले धन दांडग्याच्या घशात घालण्याचा नियोजन बद्ध पद्धतीने कागदोपत्री रेकॉर्ड तयार करून घरकुल लाभार्थी यांचा घरकुलावर ताबा नाही त्यांच्या दोन्ही घरकुल मध्ये ज्यांनी जागा घरकुल बांधण्यास दिली त्यांचेच कुंटुब त्या दोन्ही घरकुल मध्ये राहत आहे आर्थिक फायद्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाची दिशाभूल करून घरकुल जवळच्या व्यक्तीस देण्याचा केलेला कट या कटात सहभागी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार
सुनिल साळवे
अध्यक्ष – आर.पी.आय.जिल्हा अ.नगर
चौकट – – – – – – – – – –
सात दिवसांत चौकशी करून कार्यवाही करणार
सदरील प्रकरणी निवेदन प्राप्त झाले असुन ते मी निवेदन विस्तार अधिकारी यांच्या कडे दिलेले आहे विस्तार अधिकारी यांचा अहवाल आला की सात दिवसांत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल
प्रकाश पोळ
गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड