जामखेड न्युज——
गोकुळ गायकवाड यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
“धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा ” या वैचारिक ग्रंथास जेष्ठ साहित्यिक प्रा.रसुल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था महागाव ता.गडहिंगज जि. कोल्हापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विविध साहित्य लेखन प्रकारातील नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. गिरलगाव ता. भूम जि. धाराशिव येथील सुपुत्र, जि.प.प्राथ.शाळा रत्नापूर ता जामखेडचे आदर्श शिक्षक,बौध्दाचार्य,लेखक गोकुळ गायकवाड यांनी बुध्दांची धम्मपदं संत कबीर यांच्या दोह्यात आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत आहेत.
हे शोधून सप्रमाण सिद्ध केले आहे. बुद्धांचा स्वातंत्र, समता आणि बंधुता सांगणारा विचार, ” बहुजन हिताय, बहुजन सुखाय “असून हा धम्म विचार सुरूवातीला कल्याणकारी, मध्येही कल्याणकारी आणि शेवटही कल्याणकारी आहे.
हा मौलिक विचार संत कबीर यांनी दोह्यातून कसा मांडला आणि संत तुकाराम महाराज यांनी गाथेतून कशाप्रकारे मांडला हे या वैचारिक ग्रंथात सप्रमाण दाखवलं आहे. या ग्रंथास हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून सार्थ सन्मान केला आहे…. थोड्याच दिवसात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे प्रा.रसुल सोलापूरे सर यांनी जाहीर केले आहे.
गोकुळ गायकवाड यांच्या माझा गाव माझी माणसं या ग्रंथासही यापूर्वी राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षित स्वदेशी भारत सन्मान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
३०नोव्हेंबर २०२३ रोजी आसू फलटण येथे वितरण होणार आहे. या यशाबद्दल गोकुळ गायकवाड यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.