जामखेड प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांच्या विरोधात जर कोणी ताकद लावून आवाज दाबत असेल तर माझ्यासारख्या सामाजिक गुंड दुसरा कोणी नसेल ? जो संविधानाच्या विरोधात वागतो त्यांच्या साठी मी तो संदेश दिला होता. ज्यांनी आतापर्यंत फक्त गटातटाचे राजकारण केले त्यांना बिनविरोध ग्रामपंचायतीचा अर्थ काय कळणार ? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना लगावला.
आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायत झाल्यास तीस लाखांचा निधी देणार अशी घोषणा केली होती या घोषणेनंतर माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी म्हटले होते की, आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी कारण तो आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यांचा फाॅर्मुला वापरला तर भविष्यात फक्त टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील असे म्हटले होते याविषयी आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले कि, मी म्हटले होते की, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करा निवडणूकीसाठी लागणारे कष्ट व पैसा विकासासाठी वापरता येईल तसेच आजपर्यंत फक्त कोट्यावधी रुपयांच्या विकासाच्या गप्पा मारल्या पण अनेक गावातील नागरिक आजही मुलभूत सुविधा पासून वंचित आहेत. आजपर्यंत फक्त गटातटाचे राजकारण त्यांनी केले सर्वसामान्यांच्या विकासाऐवजी स्वतःचा विकास त्यांनी केला जर कोणी संविधानाच्या विरोधात वागत असेल तर माझ्या सारखा सामाजिक गुंड दुसरा कोणी नाही असेही रोहित पवार म्हणाले.
कर्जत-जामखेड मधील काही गावात सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचे काम मागिल काळात झाले. विकास मात्र झाला नाही. दमबाजी करत सत्ता काबीज केल्या आता हे मला चालणार नाही. दमबाजी होणाऱ्या ठराविक ग्रामपंचायतींसाठी व संविधानाच्या विरोधात वाढणार्या लोकांसाठी मी तो इशारा दिला होता माझ्याशी गाठ आहे.