जामखेड न्युज——
आरोग्यदायी जीवनासाठी सायकलिंग आवश्यक – चंद्रशेखर मुळे
जामखेडमध्ये प्रोमो सायकल राईड उत्साहात संपन्न
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आरोग्यदायी जीवनासाठी तसेच प्रदुषण मुक्ती साठी आपण दररोज सायकल चालवणे आवश्यक आहे असे मत अहमदनगर येथील चंद्रशेखर मुळे यांनी व्यक्त केले.
आज दि. 19 नोव्हेंबर रोजी अहमदनगर सायकलिंग क्लब व जामखेड सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेडमध्ये सायकल रायडिंग करण्यात आली. म्हणजे प्रोमो सायकल राईड आयोजित केली होती तरी ती सायकल राईड 30 किलोमीटरची होती यामध्ये जामखेड मधील सर्व सायकलिस्ट आणि अहमदनगरचे सायकलींग ग्रुपचे सायकलिस्ट बंधू हे आले होते ही सायकल राईड बीड रोड पासून चालू झाली होती व आरणगाव पर्यंत गेली आणि त्यानंतर परत बीड रोड येथे संपन्न झाली.
आजच्या प्रोमो सायकल मध्ये लहान मुलांपासून ते 55 ते साठ वर्षांच्या सायकल स्वारांनी सहभाग नोंदवला यामध्ये, शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक, गृहिणी, मुले सहभागी झाले होते.
यावेळी नितीन पाठक व डॉ. पांडुरंग सानप यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की, सायकल चालवल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते आणि रात्री झोप चांगली लागते. लठ्ठपणा कमी होतो.
या राईडमध्ये सहभागी झालेले सायकलिस्ट सुदाम वराट, डॉ. पांडुरंग सानप, आप्पा शिरसाठ, औटी सर, समीर शेख, डॉ.राठोड, डॉ. अशोक बांगर, शशिकांत राऊत, डॉ प्रविण मिसाळ, डॉ. राजकुमार सानप, डॉ. शोएब सर, डॉ. विशाखा देवकर, डॉ. शेख मॅडम, तुकाराम कुलथे, शर्मा मेजर, अभिजीत राऊत, समीर शेख, उमेश घोडेस्वार ,डॉ.सचिन काकडे, वैभव जाधव, वैभव सानप, सक्षम मिसाळ डॉ.जयंत नागरगोजे दत्तात्रय पडोळे, आप्पा भोरे यांच्या सह अनेक मान्यवर सायकलिस्ट सहभागी झाले होते.
अहमदनगर येथील चंद्रशेखर मुळे सर, नितीन पाठक सर व अहमदनगर सायकलिंग ग्रुपचा सर्व स्टाफ हे सर्वजण आले होते.येत्या 7 जानेवारी 24 रोजी अहमदनगर येथे राज्यस्तरीय सायकल रेस आयोजित केली आहे तरी त्या मध्ये स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.