जामखेड न्युज——
गरीबांच्या दवाखान्याबरोबरच डॉ. युवराज खराडे यांच्या युग लाँन्स नावाच्या मंगलकार्यालयाचा शुभारंभ
जामखेड, आष्टी, पाटोदा, भुम, करमाळा परिसरात गोरगरिबांचा दवाखाना म्हणून डॉ. युवराज खराडे यांचे हाँस्पिटल ओळखले जाते. डॉ खराडे यांनी गोरगरीब व सर्व सामान्य लोकांसाठी आष्टा फाटा येथे युग लाँन्स मंगलकार्यालयाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला
यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश धस
कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात,माजी उपआयुक्त महाराष्ट्र शासन पोपटराव गोरे, माजी आमदार साहेबराव दरेकर, डॉक्टर चंद्रकांत मोरे, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवानराव मुरूमकर, सरपंच बबन डोके, चिंचपूर सरपंच सतिश ढवळे, सरपंच नानासाहेब बांगर, गणेश माळवे, सरपंच अंगद शिंदे, सरपंच विकास पांढरे, सरपंच तुकाराम गिते, सुधीर पठाडे, सरपंच परिवंत गायकवाड, सरपंच श्रीमती छाया गायकवाड, युवानेते संतोष डोके पाटील, भागवत डोके, एकनाथ खराडे, सामाजिक कार्यकर्ते शेषराव आढाव, गोकुळ पाचबैल, हरिदास सातपुते, प्रवीण कात्रजकर, विकास जरे, अभिषेक खराडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ समुद्रे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांसाठी विवाह सोहळा, तसेच विविध कार्यक्रमासाठी प्रशस्त हाँल, पार्किंग साठी मोठी जागा, जेवनांसाठी स्वतंत्र हाँल, मुक्कामासाठी स्वतंत्र रूम असे प्रशस्त युग लाँन्स नावाचे मंगलकार्यालय आष्टा फाटा येथे सुरू करण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश धस म्हणाले की, जुन्या रूढी परंपरांना तिलांजली देत समाजात लग्न पध्दतीत अमुलाग्रा बदल झाला असून लग्न समारंभातील मंगलमय वातावरण नामशेष होत की, काय अशी भिती निर्माण झाली असून धावपळीच्या युगात काही बदल होणेही गरजेचेही आहे मात्र समाजाला रूचतील, पचतील आणि आवडतील असेच विवाहसोहळे साजरा करण्याचे आवाहन आमदार सुरेश आण्णा धस यांनी केले.
यावेळी बोलताना जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, गोरगरिबांना डॉ. खराडे हे देवदूत वाटतात. त्यांचे हाँस्पिटल गोरगरिबांचे हाँस्पिटल म्हणून ओळखले जाते तसेच आता मंगल कार्यालय हेही गोरगरिबांचे मंगलकार्यालय ठरणार आहे.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, आजपर्यंत डॉ. युवराज खराडे व डॉक्टर शितलताई
खराडे यांनी अल्पदरात रूग्णांची सेवा करून हजारो लोकांचे आशिर्वाद घेतले तसेच मंगल कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करून आशिर्वाद घेण्याचे आवाहन केले.
डॉ. चंद्रकांत मोरे म्हणाले की. डॉ. युवराज खराडे हे अहोरात्र रूग्णांची सेवा करण्यात सतत व्यस्त असतात. गोरगरिबांना ते देवदूतच वाटतात. आपल्या सेवेचा वसा ते आता मंगलकार्यालयासाठीही सुरूच ठेवतील.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत निकम महाराज यांनी तर प्रास्ताविक डॉ. युवराज खराडे यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार डॉ. शितलताई खराडे व राजू भैय्या खराडे यांनी मानले.